Wednesday, April 17, 2024
Homeवर्धादेवळी येथील तालुका कृषी कार्यालयात सेवालाल जयती.

देवळी येथील तालुका कृषी कार्यालयात सेवालाल जयती.


देवळी :
देवळी येथील तालुका कृषी कार्यालयात बंजारा समाजाचे आराध्य दैवत,समाज सुधारक संत श्री सेवाला महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.
यावेळेस संत सेवाभाया यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.


संत सेवाभाया यांनी बंजारा गणातील माणसांना बुद्धिप्रामाण्यवादी व्हायला सांगतात, घ्या, स्वातंत्र्य असा विज्ञानवादी विचार संदेश संत सेवाभाया देतात.जो आजही अत्यावश्यक आहे. तसेच सोतर ओळख सोता करून दीजो स्वतः ची ओळख कर्तृत्व दाखवून निर्माण करावी.कोणावर अवलंबून राहू नका.देवावर भजनात पूजेत वेळ घालू नका
विवेकी साथ द्यावी.सत्याचा पाठपुरावा करावा. गोर गरीबावर अन्याय करून त्यांना दंडित करू नका ,सत्याची बाजू घेवून त्याला विवेकी साथ द्यावी.सत्याचा पाठपुरावा करावा.आदी शिकवण सेवालाल यांनी दिली असल्याबद्दल यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमला मंडळ कृषि अधिकारी, अतुल वायसे,अनिल सांगळे कृषि पर्वेक्षक व इतर कर्मचारी भाग्यश्री राठोड,मनीषा मडगे,हेमलता जाधव, भाग्यश्री ताकसाडे,प्रशांत चव्हाण,कैलास सूर्यवंशी, निलेश महल्ले उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular