Thursday, April 25, 2024
Homeवर्धादेवळी पंचायत समिती सभागृहात मासिक प्रगती अहवाल आढावा सभा.

देवळी पंचायत समिती सभागृहात मासिक प्रगती अहवाल आढावा सभा.

देवळी:
देवळी पंचायत समिती सभागृहात १८ जून रोजी मासिक प्रगती अहवाल आढावा सभा जिल्ह्य परिषदेच्या अध्यक्षा सौ.सिमा गाखरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या सभेला जिल्ह्या परिषदेच्या उपाध्यक्ष वैशाली येरावार उपमुख्य कार्यपालन अधिकारी विपुल जाधव, पंचायत समिती देवळीच्या सभापती कुसुम चौधरी,उपसभापती युवराज खडतकर,गटविकास अधिकारी पंकज भोयर,जिल्हा परिषद सदस्य मुकेश भिसे,सुनिता राऊत,पंचायत समिती सदस्य अशोक इंगळे,दिलीप अग्रवाल,दुर्गा मडावी, उपस्थित होते.


यावेळी बांधकाम विभाग,शिक्षण,आरोग्य,पशुसंवर्धन एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना,कृषीभाग,स्वच्छ भारत मिशन आदी योजना बाबत त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. किती कामे पुर्ण झालीत किती अपूर्ण आहेत याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रत्यक्ष कामाचा आढावा जाणून घेतला.
झालेले कामे संपवून नव्याने कामे सुरु करावी व स्वतंत्रपणे ई टेडंरीग राबवून कामे पूर्णत्वास नेण्याच्या सुचना यावेळेस देण्यात आल्या.शाळेच्या इमारती सार्वजनिक शौचालय अंगणवाडीतील बांधकाम दुरुस्ती बांधकाम पाणीटंचाई,पशुसंवर्धन पाणीपुरवठय़ा बाबत किती कामे प्रगतीपथावर आहेत. डिपी डीसी स्मशानभूमी शेड बांधकाम बाबत माहीती जाणून घेतली. यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना कामे पुर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
आढावा सभेला कृषीअधिकारी अनिल आदेवार,पंचायत विस्तार अधिकारी दिलीप ढोणे, कृषीविस्तार अधिकारी प्रशांत भोयर गटशिक्षण अधिकारी श्री खिराळे,विस्तार अधिकारी शिवशर्मा लुटे,श्रीमती गोरे सह इतर अधिकारी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular