Friday, April 19, 2024
Homeवर्धादेवळीच्या" फुटपाथ स्कूल " मध्ये तालुका आरोग्य अधिकार्रासह ठाणेदांरानी राबविली पल्स पोलीओ...

देवळीच्या” फुटपाथ स्कूल ” मध्ये तालुका आरोग्य अधिकार्रासह ठाणेदांरानी राबविली पल्स पोलीओ मोहीम.

देवळी : शहरात तहसील कार्यालया समोर वास्तव्यास असलेले भटक्या समाजाचे लोक परिवारासह राहतात. अश्या परिवारातील लहान मुले पोलीओ डोज पासून वंचित राहू नये याकरीता देवळी चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पोलीस निरीक्षक श्री. नितीन लेव्हरकर यांनी प त्यांच्या परिवारात जावून पाच वर्षीय पर्यंतच्या मुलांना पोलिओ डोस दिला.


देवळीतील भारत सामाजिक गृप त्यांना प्रवाहात आणण्यासाठी
त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांना सातत्याने एक महिन्यापासून प्रयत्न करीत आहे. त्यांना शारीरिक शिक्षण, व्यायाम , शैक्षणिक शिक्षण देत असून रोज त्याचे एक ते दोन तास वर्ग घेतले जातात. समाजात काय घडामोडी सुरु असते त्यांना पाहिजे तशी “जाण ” नसते यांची दखल घेऊन. झोपड पट्टी या भागातच ” पोलिओ मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, डॉ. आशिष लांडे, वैद्यकीय सहायक सूर्यकांत वाघे, प्रमोद धुपे, परिचारिका जयश्री ढोले आरोग्य सहायिका छबीता चव्हाण, पदमा मॅडम, सामाजिक गृपचे सचिन वैद्य, पञकार सागर झोरे, गजानन पोटदुखे, गणेश शेंडे सामाजिक कार्यकर्ते योगेश आदमने, मयूरी येनूरकर, मीनल तिवारी, रेणुका दुरगुडे, , नरेश जोशी आणी परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular