Friday, April 26, 2024
Homeवर्धादुधाचे दर ३२ वरून आले २२ रूपयांवर

दुधाचे दर ३२ वरून आले २२ रूपयांवर


दुधाची किंमत पाणी बाटल इतकी: शेतकरी हतबल
समुद्रपूर
कोरोना वाढला अन् लॉकडाउन लागला.यात सर्वात मोठा फटका बसला तो शेती व्यवसायाला. शेती मालाला तर कवडीची किंमत आली आहे.पण दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याचा आर्थिक कणा असलेल्या दूधव्यवसाय शेवटच्या घटका मोजतोय.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३२ रुपयापर्यंत गेलेल्या गाईच्या दुधाच्या दरात एका महिन्याच्या आत तब्बल १० रुपयाची घसरण होऊन दर २० ते २२ रुपये प्रतिलिटर झाला आहे. एकीकडे कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही.शेतीमालाला चांगला भाव नाही. दुधातून दोन रुपये मिळतील म्हटलं तर त्यातून शेतकऱ्याच्या हाताला काहीच उरत नाही.



लॉकडाउनच्या नावाखाली दूध दरात मोठी घसरण झालीआहे.मात्र पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली. आहे.अशात दूध व्यवसाय परवडणार नाही.जनावरे विकायची म्हटलं तरी बाजार बंद आहेत.त्यामुळे मायबाप सरकारने या प्र२्नी लक्ष घालून न्याय द्यावा.
सचिन झाडे दूध व्यवसायिक
दूध दराचा प्रश्न हा वर्षानुवर्षे चालत आला आहे. अनेक शेतकरी संघटना या दुग्ध दरासाठी आंदोलन करून सत्तेत गेल्या.पण हा प्रश्न तसाच आहे यातून मार्ग काढायचा असेल तर साखर उद्योगासाठी जसा एफआरपी हा कायदा लागू केला.तसा दूध उद्योगासाठी सुद्धा असाच कायद्याची गरज आहे.
योगेश मांडवकर दूध व्यवसायिक
एकीकडे दुधाच्या दरात मोठी घसरण झाली,असताना मात्र जनावरांना देण्यात येणाऱ्या पशुखाद्याच्या दरात गेल्या महिन्याभरात मोठी वाढ झाली आहे. दूध वाढीसाठी जनावरांना देण्यात येणाऱ्या सरकी ढेप,जवळ ढेप, मक्का,गहू भुसा, यांच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.दूध उत्पादनात घट होऊ नये व गाईला सकस आहार देणे गरजेचे असल्याने दूध उत्पादक उत्पादकांना पशुखाद्य खरेदी केल्याशिवाय पर्यायच नाही.त्यामुळे एकीकडे दुधात दरात घसरण व दुसरीकडे पशुखाद्यात दरातील भरमसाठ वाढ यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.असून दूध व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आला आहे
नरेश झगडे व्यवसायिक
कोरोणाचा कहर मोठा असताना महा विकास आघाडी सरकारने दूध दरा संबंधी एक चकार शब्द तोंडातून काढला नाही.शिवाय शेतकरी संघटनाही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे राज्यातील खाजगी तसेच सहकारी संघांनी कोरोना लॉकडाऊनच्या नावाखाली दूध उत्पादकांची लुटमार सुरू केली आहे.दिलीप सहस्त्रबुद्धे शेतकरी

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular