Friday, March 29, 2024
Homeवर्धातालुक्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेकदिन साजरा

तालुक्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेकदिन साजरा

ब्रम्हपुरी :- संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आणि दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्त्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे छोटया पासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच माहीत आहे. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी आहे. अशाच या कारकिर्दीतील, जीवनप्रवासातील एक दिवस शिवराज्याभिषेक दिन.

तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून विविध ग्रामपंचायत,महाविद्यालय व शाळेमध्ये कोरोना विषाणूची निदर्शने पाळत भगवे झेंडे व प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी
महाराष्ट्राचे दैवत ज्यांनी आदर्श प्रशासनाचे प्रेरणा संपूर्ण भारतवाशीयांना दिले. गोरगरीबांचे राजे छत्रपती शिवराय हे आज आपल्या राज्याचे राज्यभिषेक केला.ह्या दिवसाचे महत्त्व जनतेला कळावे म्हणून शिवस्वरज्य दिवस शासन स्तरावरून साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे कोव्हिड विषाणूचे प्रार्श्वभूमी लक्षात घेवून सोसल डिस्टनिंगचे बंधने पाळून मर्यादित प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या उपस्थित शिवस्वराज्य दिवस साजरा करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे होतकरू प्राचार्य डॉ एन एस कोकोडे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवराय यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले. तसेच उपप्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी पुष्प अर्पण केले. या कार्यक्रमाला डॉ मोहन वाडेकर , सौ संगिता ठाकरे व डॉ रेखा मेश्राम उपस्थित होते.तसेच जंयती उत्सव समिती सदस्य डॉ सुभाष शेकोकार,डॉ के एम शर्मा एन सी सी गर्ल्स महा बटा, आॕफिसर,डॉ धनराज खानोरकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ प्रकाश वट्टी डॉ असलम शेख , डॉ भाष्कर लेनगुरे, डॉ मोहन कापगते डॉ राजू आदे डॉ किशोर नाकतोडे प्रा मिलींद पठाडे,प्रा बालाजी दमकोंडवार डॉ अरविंद मुंगोले डॉ पद्माकर वानखडे ,प्रा आकाश मेश्राम,प्रा बंडू गेडाम ,प्रा परकरवार श्री रूपेश चामलाटे विनय भागडकर व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत अर्हेरनवरगाव
आपल्या पराक्रमाने संपूर्ण विश्व गाजवणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.दामिनी जागेश्वर चौधरी यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर भगवा झेंडा फडकवून व महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी सरपंच चौधरी म्हणाल्या की,सध्या कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे शिवभक्तांच्या भावनांचा विचार करता शिवभक्तांनी आपल्या घरोघरी,गल्लीत,मोहल्ल्यात कोरोना महामारीचे नियम पळून महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून,महाराजांचा जयघोष करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे आव्हाहन त्यांनी यावेळी केले.सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच जितेंद्र कऱ्हाडे,ग्रामविकास अधिकारी राजू कुरेकर,ग्रा.पं.सदस्य येशुका संतोष कुथे, ग्रा.पं.सदस्य सौ.निशा ठेंगरे,ग्रा.पं.सदस्य सौ.सरिता उरकुडे,ग्रा.पं.सदस्य,ज्ञानेश्वरी ठेंगरे,ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

ग्रामपंचायत भालेश्वर
एकच धून सहा जून असा जयघोष करत वैनगंगा नदीच्या कुशीत नैसर्गिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील भालेश्वर ग्रामपंचायत येथे भगवा झेंडा उभारून व प्रतिमेचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भालेश्वर येथील ग्रामपंचायत सरपंच संदेश रामटेके,उपसरपंच शरद भागडकर, ग्रामपंचायत सदस्य राजू पिलारे, सदस्य शिल्पा तलमले,सदस्य शुभांगी अलोने,सदस्य मनोरमा दिघोरे,सदस्य शीला नागपुरे, ग्रामसेवक राजू कुरेकर, ग्रामपंचायत शिपाई भुमेश अलोने व आदी गावकरी उपस्थित होते.

Previous article
Next article
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular