Friday, March 29, 2024
Homeवर्धाट्रॅक्टर च्या साह्याने शेतीची मशागत.!

ट्रॅक्टर च्या साह्याने शेतीची मशागत.!

ऋषिकेश काबंळे
देवळी शिवारातील शेतात शेताची उन्हाळी मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरच्या तीन पावडीने नांगरणी सुरू असून कोरोणा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शेताची मशागत करावी लागते.


घरीच रहा सुरक्षित रहा असा सरकारचा नारा असला तरी पण फक्त अवघा दिड महिना मृग नक्षत्राला उरला असून उन्हाळवाही जर झाली नाही तर शेतात पीक उभे रहाणार नाही.?
मग शेतकऱ्यांनी काय करावे हा मोठा संकटकाळात गंभीर प्रश्न उभा झाला आहे.सुरक्षित जीवन प्रत्येकाला हवे आहे.पंरतु उद्याच्या सूर्योदयाची सकारात्मक व उद्याची आशाची शेतकरी वाट बघत असतो.राब राब राबून शेतकऱ्यांचे जीवन संकटात असताना त्याला कुठलेही इंकर्रीमेट मिळत नाही व कुठलेही सातवे, आठवे वेतन मिळत नाही रोज कष्ट करून चटणी भाकर खाऊन काम केल्याशिवाय जेवायला मिळत नाही.
दोन तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे उत्पादन दर वर्षी घटत आहे, या वर्षी तर अधिक प्रमाणात घट आली,, कृषिविभागाच्या सल्ल्यानुसार देवळी परिसरातील शेतकरी परहाटीची विल्हेवाट लावण्यासाठी थ्रेशिंग मशीन चा वापर करीत आहे,तर काही शेतकरी पराटी उपटून जाळून टाकीत आहे,यामुळे पुढील हंगामातील कपाशीच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल,असे जाणकार शेतकरी सांगतात,
काळ बदलला आता बैलाच्या सहाय्याने नांगरणी केल्या जात नाही. कारण मजूर मिळत नाही.व दिवस जास्त प्रमाणात लागत असल्याने यंञाच्या सहाय्याने तिन पावड्याने नांगरणी करण्यात शेतकरी गुंतला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular