Friday, April 19, 2024
Homeवर्धाजिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आष्टी येथील विविध विषयावर चर्चा

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आष्टी येथील विविध विषयावर चर्चा

कोविड १९ सह विविध विषयांवर जनसंवाद
अंतोरा : जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासकीय दौऱ्यानिमित्त येथील तहसील कार्यालयात कोविड १९ संदर्भासह विविध संघटनेच्या प्रतिनिधी सोबत चर्चा केली त्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहल कासारे व आष्टी ग्रामीण रुग्णालय अधीक्षिका डॉ. अर्शिया शेख यांच्यासोबत कोविड १९ संदर्भात आरोग्य उपाय योजना,तालुका आरोग्य सद्यस्थिती व सुधारणा,प्रशासकीय यंत्रणा विषयी माहिती घेऊन मार्गदर्शन केले.


त्यानंतर आष्टी येथील व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र, किराणा दुकाने,उपाहार गृह, हार्डवेअर दुकाने इत्यादीसह विविध प्रतिष्ठाने उघडण्याच्या विनंतीसह कोविड १९ अंतर्गत असलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आश्वासन देऊन दैनदिन दिवसा १२ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यासाठी चर्चा केली. त्यात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि व्यापारी संघात सकारात्मक चर्चा घडल्याचे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष निखिल लाड यांनी तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेती अभावी असलेले अर्धवट घरकुले, घरकुल धारकांची बांधकाम स्थगिती त्यात रेती संदर्भात होत असलेली अवैध लूट, लीलाव न होता खाली झालेले रेतीघाट यावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल गजरे यांनी उचललेला मुद्दा बैठकीत अधिक चर्चेत होता याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना करून अहवाल सादर करण्याचे निश्चित केले सदर प्रसंगी आष्टी व्यापारी संघाचे अध्यक्ष अतुल गुल्हाने, उपाध्यक्ष निखील लाड, सचिव दिलीप गुप्ता, तालुका कृषी सेवा केंद्राच्या वतीने सोनू भार्गव व पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राहुल गजरे यांच्यासोबत तहसील कार्यालयात विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तर प्रशासकीय दौर्‍यात अधिकारी वर्गात आर्वी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार आशिष वानखडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल कासारे, मुख्याधिकारी गौतम शंभरकर, नायब तहसीलदार रणजित देशमुख, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. अर्शिया शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र चांदे, तळेगावचे पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, मंडळ कृषी अधिकारी जोत्सना घरत आदीसह अनेकांची उपस्थिती होती

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular