Friday, March 29, 2024
Homeवर्धाजाम येथे राष्ट्रीय महामार्गावर रोखली २ तास वाहतुक

जाम येथे राष्ट्रीय महामार्गावर रोखली २ तास वाहतुक

आमदार कुणावार,आमदार आंबटकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
हिंगणघाट ;
ओबीसींच्या न्याय्य मागण्या सरकारने मान्य कराव्या या मागणीसाठी समुद्रपुर तालुक्यातील जाम येथे आमदार समिर कुणावार, विधान परिषद सदस्य डॉ.रामदासजी आंबटकर यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करीत ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली.


सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान शेकडो पक्षकार्यकर्ते
आंदोलनस्थळी उपस्थित होत तब्बल २ तास राष्ट्रीय महामार्गावरची वाहतुक रोखुन धरली होती,
आंदोलनाला आमदार समीर कुणावार , आमदार रामदास आंबटकर, जिल्हा भाजपा महामंत्री किशोर दिघे, नगराध्यक्ष प्रेम बसंताणी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद मृणाल माटे, पंचायत समिती सभापती सुरेखा टिपले, हिंगणघाट पंचायत समिती सभापती शांताताई आंबटकर, वसंतरावजी आंबटकर, तालुकाध्यक्ष संजय डेहने, तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, हिंगणघाट शहर अध्यक्ष आशिष पर्बत, समुद्रपूर नगराध्यक्ष गजु राऊत, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अंकुश ठाकूर, प. स. माजी सभापती गंगाधर कोल्हे, पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे, तुषार आंबटकर , कैलास टिपले, सुनील डोंगरे , बिस्मिल्ला खान, अनिल गहरवार , वामनराव चंदनखेडे , कवीश्वर इंगोले , रोशन रोशन पांगुळ , चंदू माळवे विनोद विटाळे, सरपंच नितीन वाघ , सुभाष कुंटेवार, सिंदी रेल्वे नगर परिषदेच्या अध्यक्षा बबीता तूमाने ,ओम प्रकाश राठी, जयंत बडवाईक ,अमोल गवळी ,मनोज पेटकर ,देवा कुबडे, राकेश शर्मा, किशोर रोंगे, दिनेश वर्मा ,शिवाजी आखाडे, कैलास टिपले, वामनराव चंदणखेडे यांचे सह सरपंच, नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलिसांनी आमदार कुणावार,आ.आंबटकर यांचेसह सर्व आदोलकांना ताब्यात घेऊन सुटका केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular