Thursday, April 18, 2024
Homeवर्धागौळ येथे सोयाबीन शेती पिक शाळा.

गौळ येथे सोयाबीन शेती पिक शाळा.

देवळी: तालुका कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिक शेतीशाळेचे आयोजन गौळ येथे १३ जुलै रोजी करण्यात आले.
मौजा गौळ शिवारातील असलेल्या खटेश्वर खोडके या
शेतकऱ्याच्या शेतात शेती शाळेचे वर्ग आयोजित करण्यात आला होता.


या शेतीशाळामध्ये सोयाबीन पिकांचे_ निरीक्षण घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुंभार यांच्या मार्गदर्शनात कृषी सहाय्यक निलेश महल्ले यांनी शेतकर्याना शत्रूकिड व मित्रकिड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करुन सोयाबीन पिकात प्रत्यक्ष शेतकऱ्याना शञु किड व मिञ किडाबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
सोयाबीन पिकावर सध्या खोड माशी आणि चक्रीभुंगा नियंत्रण करणेसाठी नेहमी पिकांची पाहणी करून शिफारस केलेल्या कीटकनाशके ची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला.व पिकावर पहिली फवारणी निंबोळी अर्क ची करण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच रासायनिक खतांची10% बचत, कृषिक अँप च्या मदतीने खताचे नियोजन करण्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तुर पिकाची शेंडे खुडणी विषयी प्रात्यक्षिक व त्याचे होणारे फायदे या माहीती देण्यात आली.यावेळी शेतीशाळा वर्गास सरपंच मिलिंद खोडके उपसरपंच मनोज नागपुरे पोलीस पाटिल अरविंद कांबळे पञकार योगेश काबंळे शेतकरी खटेश्वर खोडके समिर सारजे, प्रमोद भेंडे,अरूण सारजे,प्रणित नागपुरे,
प्रशांत राऊत, प्रविण वाघमारे , शुभम गावंडे प्रमोद वानखेडे, वृषभ गावंडे,
निखिल जगताप , प्रभाकर कडू नारायण शिंदे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular