Thursday, March 28, 2024
Homeवर्धागिरोली रस्त्यावर खड्डे बुजवून डागडुजी सुरू.

गिरोली रस्त्यावर खड्डे बुजवून डागडुजी सुरू.


देवळी:
देवळी वरून गिरोली – गौळ कडे जाणारा रस्त्या खड्डामय झाला असून या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खड्डे त्वरित बुजवा अशी नागरिकांच्या मागणीचे वृत्त येताच बांधकाम विभाग झोपेतून जागे झाले. आणि रस्त्याच्या डागडुजीला सुरवात करण्यात आली.


या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून जागोजागी ठीगळ लावणे सुरू झाले आहे. खड्डे माञ पुर्ण पणे न बुजवता काही खड्डे तसेच गिट्टी भरून ठेवले त्यावर डाबंर न टाकता पुढे पुढे काम सुरू करण्यात आले.
या रस्त्यावर काम व्यवस्थित होण्याकरीता बांधकाम विभागाकडून लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
या रस्त्यावरून मोटारसायकल चालवितांना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले, असून राञीच्या वेळी अंधारात खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे .अपघाताची मालिका वाढू नये याकरीता खड्डामय रस्त्यावर ढिगळ लावून व्यवस्थित पणे डाबंराचे प्रमाण ठेवण्यात यावे.जेणेकरून पुढे ढिगळ बुजवणे व मागुन ढिगळ उखरणे प्रकार होवू नये.
वाहनधारक प्रवाशी यांचे जीवन सुरक्षित राहण्याकरीता गिरोली कडे जाणाऱ्या रस्त्यावर चांगल्या प्रकारे रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular