Friday, April 19, 2024
Homeवर्धागिरड येथे झेप फौंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

गिरड येथे झेप फौंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

तालुका प्रतिनिधी अमोल झाडे समुद्रपुर

समुद्रपुर:-
तालुक्यातील गिरड येथील झेप फौंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार घेण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील जेष्ठ नागरिकांनी उपस्थिती होती. यावेळी ग्रामविकासाच्या मुद्द्यावर मान्यवरांना आपली मत मांडली. तर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावकर्यांनी सुचविलेले नियोजित करण्याचा संकल्प केला.


झेप फॉउंडेशन च्या माध्यमातून विचारं व्यक्त होणारे व्यासपीठ असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. यावेळी वसंतराव पर्बत, होमदेवराव गिरडे, शांताराम भुरे, अरुण मोटघरे, यादवरावजी गाठे, त्याच सोबत नुकतेच निवडून आलेले ग्रा. प. सदस्य शेख इस्राईल, राजू नौकरकर, अमोल पर्बत, मंगेश गिरडे, राहुल गाढवे, शूभम बावणे विजया तेलरांधे, इंदुबाई कापसे आदी मान्यवरांना झेप फाउंडेशनच्या वतीने सन्माननीत करण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन झेप फौंडेशन चे तुषार गिरडे, संकेत ढाकरे, शुभम वैद्य, प्रवीण तिमांडें, अंतरिक्ष घेणगारे, संकेत शेगोकर, अभिषेक उगे, राहुल गाठे, शुभम लांबट, आदी सदयसानी परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular