Friday, March 29, 2024
Homeवर्धाकोरोना लॉकडाऊनचे'साइड इफेक्ट्स'

कोरोना लॉकडाऊनचे’साइड इफेक्ट्स’

व्यावसायिकामध्ये पसरत आहे नैराश्य दीड वर्षापासून व अनियमित व्यवसाय
समुद्रपूर
जवळपास दीड वर्षापासून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्रत अल्प आणि दीर्घ मुदतीचे लॉकडाऊन सुरू आहेत.अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.कोरोना ओसरला असे वाटत असतांनाच पुन्हा यावर्षी मार्चपासून कुणाची जबरदस दुसरी लाट आली आणि या दुसऱ्या लाटेने छोट्या-मोठ्या व्यापारी व व्यवसायिकांची पूर्ण वाताहत झाली. आता कोरोनाचे साईट इफेक्ट्स नागरिकांच्या आरोग्यसोबतच व्यवसायिकांवरही दिसून येत असून, त्याच्यामध्ये नैराश्याचे वातावरण आहे.


सन उत्सव यात्रा भंडारे दोन सिजनापासून बंद आहेत लग्न समारंभ घरगुती पद्धतीने होत आहेत काही दुकाने उघडी ठेवायला परवानगी आहे तर काही दुकानांना नाही त्यातील सकाळी सात ते अकरा ही ग्राहकांची अतिशय अयोग्य वेळ आहे. कापड दुकाने,इलेक्ट्रिकल्स स्टोअर्स,जनरल स्टोअर्स,शुज सेंटर, मोबाईल शॉपी,सुवर्णकार,भांड्यांची दुकाने, इत्यादी अनेक छोट्या-मोठ्या दुकानदानांना परवागणी नाही. सोबतच नाभिक व्यवसायिक,हार फुले विक्रेते,आईस्क्रीम विक्रेते,पाणीपुरी विक्रेते,रसवंती,बूट पॉलिश करणारे, लॉन्ड्री चालक,सर्व व्यवसायिकांची कमाई ठप्प झाली आहे. मंगल कार्यालयांना कुलूप आहे.आचारी कॅटरस यांना रोजगार नाही.मंडप व बिछायत केंद्रात साहित्य धूळ खात पडलेले असल्याने व लाखो रुपयांची गुंतवणूक करून 0 रुपये मिळत असल्याने मंडप बिछायत केंद्र संचालक काळजीत पडले आहेत.या सर्व लहान मोठ्या व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये नैराश्य पसरली असून ते वैफल्यग्रस्त होत आहे.
कामगारांचे वेतन,भाड्याचा प्रश्न दुकाने बंद असताना जागेचे भाडे, इलेक्ट्रिक बिल,कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते कसे भरावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.कोरोणा नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना अमलात आणाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लॉकडाउनचा भुर्दंड या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे.आपली दुकाने सुरू होणार की नाही व झाल्यास ग्राहकी होणार की नाही या भीतीने वरील वर्गाला पछाडले असून, त्याच्यात कमालीची नैराश्य पसरत आहे.यातून नवीनच सामाजिक समस्या उद्भवू शकते.
अपराधी भावनेने व्यवसाय
रोजी पोट भरण्यासाठी आम्हाला अपराधी भावनेने व्यवसाय करावा लागत आहे.नियम मोडण्याची इच्छा नसतानाही खर्च भागवण्यासाठी छुप्या मार्गाने आम्हाला व्यवसाय करावा लागत आहे. लॉकडाउनपेक्षा सरकारने संशोधने उभी करून प्रभावी उपाययोजना कराव्यात.म्हणजे कुणावर उपासमारीची वेळ येणार नाही अशा प्रतिक्रिया हार्डवेअर व्यवसाय प्रज्वल आकडे यांनी व्यक्त केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular