Thursday, April 25, 2024
Homeवर्धाकोरोना काळात सेवा देऊन प्राण वाचविणार्या डॉक्टरांच्या सत्काराने पार पडले झेंडावंदनाचा कार्यक्रम

कोरोना काळात सेवा देऊन प्राण वाचविणार्या डॉक्टरांच्या सत्काराने पार पडले झेंडावंदनाचा कार्यक्रम


सिंदी रेल्वे : येथील गांधी चौकात स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय झेंडावंदन कोरोना काळात अवीरत सेवा देणारे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर मधुकरराव कोल्हे यांचा हस्ते करण्यात आला आहे.


डॉक्टर कोल्हे यांचे B.sc चे शिक्षण डॉ.बाबासाहेब आमटे यांच्या वरोरा येथील आनंदवन महाविद्यालयात घेत असताना डॉ.आमटे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वैद्यकीय शिक्षण घेतले व 42 वर्षेपासून अविरतपणे सामान्य माणसाची वैद्यकीय सेवा करीत आहे,
अशातच देशातील कोविद -19 च्या भीषण संकटाचा काळात सिंदी शहरात प्रत्यक्षपणे रात्रीचे 3 वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचे उपचार केले,अनेक गावखेडयातून आलेले सामान्य नागरिकांचे कोरोना रोगांपासून प्राण वाचविले,याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मधुकर कोल्हे यांचे नगराध्यक्षा बबिता तुमाणे यांचे हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,
त्याचप्रमाणे शहरातील माजी नगराध्यक्षा डॉ.शालिनीताई मुडे, डॉ.तेलरांध्ये, डॉ.कोडवते,डॉ. ए .विश्वास यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,व काही अडचणीमुळे उपस्थित न झालेले डॉ,रवींद्र शेटे,डॉ,लीलाधर पालिवाल,डॉ. श्रावन शिवरकर,डॉ.श्रीकांत वाझुरकर,डॉ. सौ. राठोड,डॉ,अल्पेश कोहळे यांचेही अनु उपस्थित शब्द सुमनाने स्वागत करून आभार मानले,
शहरातील पुणे येथील संस्कृत विद्यालयाचा विद्यार्थी विराज राहुल कालोडे,वय 6 वर्षे यांनी 3मिनिट 52 सेकंद मध्ये 100 देशातील 100 जातीच्या मिरचीचे नावे सांगण्याच्या विक्रम केला असून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याच्या विक्रम केल्याबद्दल त्यांचा, राष्टीय दिनी बँड पथकासह दाखल होत सेवानिवृत्ती पर्यंत तिरंग्याला मानवंदना देण्याचे कार्य अविरतपणे करणारे माजी प्राचार्य प्रकाश कामडी,कोरोना काळात रुग्णांना नागपूर ,वर्धा येथे उपचारासाठी पोहचविण्याचे अविरत कार्य करणारे मनोज पेटकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक प्रकाशचंद्र डफ होते, कार्यक्रमाला जेष्ठ नेते बबनराव हिंगणेकर, सर्व नगरसेवक नगरसेविका,पत्रकार मंडळी,शेतकरी संघटनेचे निलकंठराव घवघवें, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष वसंता सिरसे, शिवसेना प्रमुख मंगेश माहुरे, मुन्ना शुक्लाजी, नेहरू विद्यालयाचे,विजय विद्यालयाचे,नगर विद्यालयाचे सर्व शिक्षक गण तसेच शहरातील देशप्रेमीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular