Thursday, March 28, 2024
Homeवर्धाकोरोनात संसर्गाने एका महिन्यात पाच ५ जीवलग मित्राचा मृत्यू

कोरोनात संसर्गाने एका महिन्यात पाच ५ जीवलग मित्राचा मृत्यू


तालुका प्रतिनिधी
समुद्रपूर

कोरोना संसर्गाने केव्हा कोण जाईल सांगता येत नाही अस्याचं समुद्रपूर शहरातील पाच जिवलग मित्रांना एका महिन्याच्या आत मृत्यूने कवटाळले आहे यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
विद्या विकास महाविद्यालय चौकातील एका बैठकीच्या ठिकाणी हे जिवलग मित्र भेटायचे गप्पा गोष्टीत रमायचे पण,कोविंड १९ या संसर्ग थांबण्याचे ऐवजी समुद्रपूर शहरात थैमान घातले असून,बरेच रुग्ण बाधीत झाले होते तर काही ना मृत्यू च्या दाढेत लोटले गेले .त्यापैकी चार जिवलग मित्र एकाच वार्डातील असून शिक्षक वसाहतीमध्ये राहणारे होते.


शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोणाची अँटीजन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते, पण पॉझिटिव आल्यावर त्यांना कोविड सेंटर म्हणून कोणती सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बरेच हाल होत आहे.त्यामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत गेला. शहरातील बरेच रुग्ण मरण पावले. यात सागर कापकर(४५) राजू इटनकर वय ५५ दुर्वास चांदेकर वय ५४ गुणवंता लोखंडे वय ४५अलीम शेख वय ४३ हे पाच जिवलग मित्र एका महिन्यात काही दिवसांच्या अंतराने कोरोणामुळे मरण पावल्याची घटना समुद्रपूर येथे घडली यापैकी सागर कापकर हा सामाजिक कार्यकर्ता होता तर,राजू इटनकर शेतकरी होता. दुर्वास चांदेकर हे शिक्षण महर्षी झोटिंग पाटील महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक या पदावर होता तर, गुणवंत लोखंडे कोणतेही काम करीत होता.तर अलीम शेख हे जाम चौरस्ता च्या बाजूला फकीर वाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक होते.यापैकी
कापकर,चांदेकर,लोखंडे यांचे सेवाग्राम येथे उपचार सुरु होते.तर अलीम शेख हे सावंगी मेघे रुग्णालयात उपचार घेत होते.तर इटनकर हिंगणघाट येथे उपचार घेतला.पण उपचारा ला शरीराने साथ न दिल्याने परिवाराला यांना मुकावे लागले.
.समुद्रपूर हे तालुक्याचे ठिकाण असून ग्रामीण रुग्णालयात कोरोना सेंटर नसणे हे शोकांतिका आहे. या विभागाचे आमदार ह कार्यसम्राट असून त्यांनी समुद्रपूरला कोवीड सेंटर करिता प्रस्ताव सुद्धा पाठविला परंतु प्रशासनाने अजूनही त्या कडे लक्ष दिले नाही क
.
कोरोना संसर्ग पाहता येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Previous article
Next article
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular