Saturday, April 20, 2024
Homeवर्धाकोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहताच उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार आर्वी शहर कडेकोड बंद

कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहताच उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार आर्वी शहर कडेकोड बंद

आर्वी : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता जिल्या प्रशासनाने 36 तासाची संचारबंदी लागू केली याला आर्वीकरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

आर्वी शहरातील सर्व व्यवसायिकांनी एक दिवसीय व्यापार व दुकाने बंद ठेवून आर्वी बंद ला प्रतिसाद दिला. आर्वी येथील शाळा, एसटी महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहने, सांस्कृतिक भवन, धार्मिक स्थळे, वाचनालय व गर्दीचे सर्व ठिकाणे कडेकोड बंद ठेवण्यात आले होते. तसेच तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी ज्या रुग्णांमध्ये सर्दी ,ताप, खोकला इतर लक्षणे आढळल्यास अशा सर्व रुग्णांची नोंदणी गुगल फॉर्म द्वारे प्रशासनाकडे नोंद करण्याबाबत निर्देश देण्यात आले . तसेच अशा रुग्णांना संबंधित डॉक्टरांनी कोरोना चाचणी करावी, असे निर्देश रुग्णास द्यावेत असे सांगण्यात आले. व्यापारी दुकानदार भाजीपाला विक्रेता व सर्व आस्थापनांनी आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझरचा साबण व पाणी उपलब्ध करून द्यावे , व विना मास्क ग्राहकास वापर करण्याबाबत निर्देश द्यावेत, मास्कचा नियमित वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अत्यावश्यक असल्यास सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे,
सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात पोलीस स्टेशन मार्फत पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील असेही सांगितले होते. अशा कार्यक्रमात बैठकीत केवळ 50 व्यक्ती उपस्थित राहण्यास परवानगी राहील असेही सांगितले, कोणत्याही मिरवणुक व रॅली काढण्यास प्रतिबंध राहील.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular