Tuesday, March 19, 2024
Homeवर्धाकेन्द्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावनी करा

केन्द्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावनी करा

                                    -खासदार रामदास तडस




वर्धा :- जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, कौशल्य विकास, महामार्ग विकास, जलजिवन मिशन अंतर्गत हर घर जल हर घर नल या योजनासह इतर विविध केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावे, तसेच केन्द्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे  अंमलबजावनी करा. असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस यांनी जिल्हा विकास समन्वय व संनियत्रण समिती (दिशा) च्या बैठकीमध्ये दिले.

          आज जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे जिल्हा विकास  समन्वय  व सनियंत्रण  समिती (दिशा) ची बैठक समितीचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार डॅा. रामदास आंबटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे उपस्थित होते.

      यावेळी श्री. तडस यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत तातडीने पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देऊन घरे बांधण्यास सहकार्य करावे, तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नागरिकांना व लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून राज्यशासनाच्या वतीने भुखंडाचे पट्टे वाटप करणे क्रमप्राप्त आहे. परंतु देवळी तालुक्यात व देवळी नगरपरिषद मध्ये 600 भुखंडापैकी राज्यशासनाने फक्त 28 भुखंड वाटप केले त्या विलंबाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली. शेतक-यांना कृषी कामांमध्ये वीज पुरवठयात अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी महावितरणने घ्यावी. ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी तत्पर पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवावी, तसेच शेतक-यांना कृषी कर्ज तातडीने कोणतीही अडचण येणार नाही यांची खबरदारी अग्रणी बॅंकेने घ्यावी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सर्व कामे प्राधान्याने विहीत मुदतीत पूर्ण करावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधितांकडून तातडीने पाठपुरावा करुन कामे पूर्णत्वास न्यावी, जिल्ह्यात शेतकरी, ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्व मूलभूत सोयीसुविधा गुणवत्तापूर्ण उपलब्ध करुन द्याव्यात, सिंचन विषयक सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत असेही यावेही खा. तडस म्हणाले.

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सर्व योजनांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत माहिती देऊन प्रलंबित कामे संबंधित विभागाकडून कालमर्यादेत पूर्ण करुन घेतल्या जातील, असे सांगितले.

      खासदार रामदास तडस यांनी सविस्तरपणे लोकप्रतिनिधीं व अशासकीय सदस्यांच्या सूचना ऐकुन घेत संबंधित विभागाने केलेली कार्यवाही, त्यातील अडचणी जाणून घेत तातडीने काम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी मोफत लसीकरण, राष्ट्रीय आरोग्य मिशन, कृषी सिंचन, कृषी कर्ज, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ/विधवा/विकलांग निवृत्ती वेतन, उज्वला गॅस, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, नगरपालिकांतर्गत पाणीपुरवठा, 15 वा वित आयोग, दलित वस्ती विकास योजना, जलजीवन मिशन कृती केंद्रीय योजना तसेच ग्रामपंचायत निहाय टेलीकॉम योजनेंतर्गत ब्राँडबँड सुविधा उपलब्ध होण्याबाबतच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला.

      कार्यक्रमाचे संचालन व समन्वयन अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा सत्यजीत बडे यांनी केले, बैठकीला अतिरीक्त जिल्हाधिकारी श्री. महीरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. मेसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बुब, जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. कुंभे, पंचायत समितीचे सर्व सभापती, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच केन्द्रशासनाच्या विभागाच्या संबधीत अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनीधी अशासकीय सदस्य तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular