Friday, March 29, 2024
Homeवर्धाकामगारांचा न्यायासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा

कामगारांचा न्यायासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा

हिंगणघाट :

मोहता मिल कामगाराचा उपविभागीय अधिकारी कार्यालयवर विशाल मोर्चा,
कामगार नेते डाॅ.उमेश वावरे याच्या नेतृत्वात मोहता मिल कामगारा सोबत उपविभागीय अधिकारी हिंगणघाट याच्या कार्यालयात धडक मोर्चा काढन्यात आला यावेळी निवेदन देवून चर्चा करण्यात आली .


कंपनी १३५ वर्षं जुनी असुन हिंगणघाट व ग्रामीण भागातील संपूर्ण उदरनिर्वाह त्या कंपनीवर अवलंबून आहे,कंपनी संचालकानी अचानक मिल बंद केल्यामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगाराचे ३० ते ४० वयाचे दरम्यान असुन रोजगाराच्या पेच निर्माण झाला आहे. मागील अनेक महिण्याचे वेतन कामगाराना मिळाले नाही.जर संचालक मंडळास गिरणी बंद करावयाची असेल तर संपूर्ण कामगाराना कंपनी अक्ट नुसार व्हीआरस देण्यात यावे.
व प्रोत्साहन १० लाख देण्यात यावे.
त्याच्या हक्काचा पैसा देण्यात यावा अन्यथा कामगारा समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.असे निवेदनात म्हटले आहे.
जर एखादा कामगाराने आर्थिक विवंचनेने आत्महत्या केल्यास मिलमालकास जबाबदार धरून व त्याच्यावर ३०२ नुसार गुन्हा करावा का असा सवाल करीत सदर मिलाची सोसायटी असून त्या सोसाटिचे रक्कम ३६ लाख रूपये मिलमालकांकडे अजूननही जमा आहे तो सोसाटिकडे जमा करण्यात यावे, ईएसआय रक्कम मिलमालकाने भरली नसल्यामुळे कामगाराना ईएसआय चे लाभ मिळणे बंद आहे त्वरित मिलमालकाकडून ईएसआय च्या रक्कम भरण्यात यावी जर ८ दिवसात मागणी मान्य नाही झाली तर या पेक्षा तिव्र आदोलन ईशारा देण्यात आला,
निवेदन देताना,दिलीप कहूरके, मनिष कांबळे,राजेश खानकूरे, प्रदीप माणिकपुरे,विलास ढोबळे,देवरावभ साबळे,अरूण काळे,गुलाबराव पिपळशेंडे,अनिल तादूळकर, रत्नाकर कुंभारे,मधुकर जागडे,नितिन कानकाटे जिवन उरकुडे व अन्य मिल कामगार व महिला उपस्थित होते..

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular