Saturday, April 20, 2024
Homeवर्धाउपविभागीय अधिकाऱ्यांमार्फतव्हाट्सअप च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत
व्हाट्सअप च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

देशभरात कोरोणा नि हाहाकार घातला असुन बरेच निराधार गरजू लोकांपर्यंत शासन व प्रशासन पोहचू शकत नाही अशा निराधार,अपंग,महीला व म्हाताऱ्या लोकान पर्यंत ज्येष्ठ नागरिक निराधार संघटना जावून शोधून काढत आहे व त्यांना योजनांची माहिती व योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे.


२०१२ पासून ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेनं या कामासाठी लोकांना मदत करीत आहे. निराधारांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून निराधारांना न्याय देण्याचा काम गेल्या कित्तेक वर्षांपासून करीत आहेत.
निदर्शनास आले की निराधारांची उत्पन्न मर्यादा गेल्या कित्तेक वर्षापासून शासनाने २१००० रू निर्धारित केली आहे. परंतु २१००० जर निरधारांची उत्पन्न मर्यादा शासन ठरवतो तर २९ रुपयात दोन वेळचे जेवण या महागाईच्या काळात निराधार नागरिक दवाखाना,औषधोउपचार व घर चालवण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आदी सुद्धा शासनाला वारंवार पत्र लिहून लक्षात आणून दिले परंतु शासनाने ज्येष्ठ नागरिक व निराधारांच्या उत्पन्न मर्यादा अद्याप वाढवून दिली नाही
एकीकडे शासन २१००० रुपयाचा निराधारांना दाखला मागतो तर दुसरीकडे २१००० दाखला देण्यास नकार मिळते,असे किती दिवस चालणार म्हणून शासनाने निराधारांना उत्पन्न मर्यादा २१००० वरून वाढवून ५००००रू करावी,
अशी विनंती हिंगणघाट तालुक्याच्या काँग्रेसच्या महिला अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश जेष्ठ नागरिक निराधार संघटनेचे
मंगला ठक यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना देण्यात आले.
महागाईचा काळ बघता सरकारला विनंती करण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular