Friday, April 19, 2024
Homeवर्धाइंधन बचत मोहिमेचे हिंगणघाट आगारात उदघाटन

इंधन बचत मोहिमेचे हिंगणघाट आगारात उदघाटन


१६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत इंधन बचत मोहीम
हिंगणघाट

   येथील एस टी बस आगारात इंधन बचत मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आगार व्यवस्थापक सचिन नेवरे तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.अभिजित डाखोरे,तर प्रमुख उपस्थिती बस स्थानक प्रमुख नंदकिशोर मसराम,वाहतूक नियंत्रक ज्योती उरकुडे,अधीक्षक सुयश खरतडकर यांची होती,ही मोहीम १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून या अनुषंगाने जनजागृती करण्यात येणार आहे.

इंधन बचत काळची गरज यावर वक्त्यांनी मते व्यक्त केली.
यावेळी इंधन बचत करणाऱ्या चालकांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला,कार्यक्रमाचे संचालन हितेंद्र हेमके तर आभार प्रफुल्ल मांडवकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular