Saturday, April 20, 2024
Homeवर्धाआजंती शिवारात दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

आजंती शिवारात दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील अपघात

हिंगणघाट:
शहरा जवळील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील आंजती शिवारात गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एम एच ३२ ए.सी ५६३४ व एम एच ३२ ए.ई ७२६५ या दोन दुचाकीची समोरा समोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वाराचा मुत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीला मिळताच साय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर उमरे,पोलिस कर्मचारी ज्योती राऊत, गौरव खरवडे,अजय बेले,प्रदिप डोंगरे यांनी जखमी रमेश गोविंदाराव भोमले राहणार आजंती व पवन कुबडे राहणार हिंगणघाट या दोद्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रमेश गोविंदाराव भोमले यांनी उपचापुर्वी मुत्य घोषित केले.
तर पवन कुबडे यांच्यावर उपचार सुरू आहे.
या अपघाताची नोंद हिंगणघाट पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular