Friday, March 29, 2024
Homeवर्धाआकोली येथील पुलवजा बंधाऱ्याचे पालकमंत्री सुनील केदार,यांचे हस्ते लोकार्पण

आकोली येथील पुलवजा बंधाऱ्याचे पालकमंत्री सुनील केदार,यांचे हस्ते लोकार्पण


सेलू:
,मुद व जलसंधारण उपविभाग,वर्धा यांचे वतीने बांधण्यात आलेल्या आकोली येथील नदीवरील पुलाजवळील बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा १५ ऑगस्ट रोजी रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांचे शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार रणजित कांबळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शेखर शेंडे,पं. स. सुनिता अडसुळे आकोलीच्या सरपंच वैशाली गोमासे, उपसरपंच रजिंत देवढे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सतिश मोवाडे, ठाणेदार सुनिल गाढे ,सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप पिंपळे याची प्रमुख उपस्थिती होती.



मुद व जलसंधारण विभागाकडून आकोली येथील नदीवरील बांधण्यात आलेल्या पुलं वजा बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या मुद जलसंधारण विभाग नागपूरच्या वतीने निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या या निमंत्रण पत्रिकेमध्ये भाजप चे राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे लोकसभा सदस्य रामदास तडस, आमदार नागो गाणार, आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, जिप सदस्य व माजी बालकल्याण सभापती सोनाली कलोडे याची प्रमुख पाहुणे म्हणून नावे छापण्यात आली होती. परंतु यापैकी कोणत्याही लोकप्रतिनिधीने या कार्यक्रमाला उपस्थित न राहता या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
————————

या कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री सुनिल केदार याची ढोल ताशा गजरात मिरवणूक काढण्यात आली. आकोली येथील ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री सुनील केदार, आमदार रंजित कांबळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शेखर शेंडे यांचा ग्रामपंचायत सदस्य व नागरीकाकडून शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राप. सदस्य माधव जुवारे नितेश हिवसे, अँड विशाल गोमासे ,सतिश इंगळे सुकदेव गाजुंडे, साहेबराव चोपडे,अरूण इंगोले, नारायण सहारे, अशोक पिंपळे,शाम उडाण, अशोक उड्डाण, चंद्रशेखर गोमासे, विनोद शेळके, दिपक नरताम, वंदना शेळके, रंजना गोमासे, प्रज्ञा गोमासे,शितल गोमासे, दिपक इंगोले, वासुदेव इंगोले, दिपक अडसूळे, मयूर अडसुळे, विण्णू देहारे, लालचंद सोलंकी , शेरसिंग सोलंकी,प्रकाश सोलंकी,ग्रा,प, सदस्या, वनिता खैरकार ,माया सोलंकी व जामणी म्हसाळा,तामसवाडा , आमगाव, मदनी,येथील नागरीकाची, मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular