Friday, March 29, 2024
Homeवर्धाआईला सॅल्यूट करून साजरा केला जागतिक महिला दिवस

आईला सॅल्यूट करून साजरा केला जागतिक महिला दिवस

आर्वी : स्थानिक न.प. गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिक या कोरोना काळामध्ये जरी शाळेत येऊ शकत नाहीत तरी विद्यार्थी नेहमीच वेगवेगळे नवीन उपक्रम राबवत असतात. याही वेळेला जागतिक महिला दिवस हा आपण इतरांकडे जाऊन त्यांचा सत्कार करू शकत नाही विद्यार्थी एकत्र बोलवू शकत नाही परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच राहून आपल्या आईला सॅल्यूट करून हा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये एनसीसी छात्र सैनिकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू ,ग्रीटिंग कार्ड,पुष्प गुच्छ आपल्या आईला दिले आणि ती जे काम करत आहे ती मग अशिक्षित आहे, असो सुशिक्षित,असो मोठ्या पदावर काम करणारी असो की गृहिणी असो प्रत्येक आईचे योगदान हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमुल्य असंच असते.

आज ज्या काही स्त्रिया आपण बघत आहोत की रिक्षा पासून तर अंतरिक्षा पर्यंत त्यांनी जी झेप घेतलेली आहे परंतु या सर्व यशस्वी स्त्रियांच्या मागे त्यांच्या आईचा वाटा हा सिंहासारखा असतो त्यामुळे त्या कुठेतरी दुर्लक्षित होतात आपण ज्या उच्च पदावर कार्यरत स्त्रिया आहेत त्यांचाच सत्कार प्रत्येक वर्षी आयोजित करत असतो. परंतु ह्या कोरोना काळामध्ये एनसीसी छात्र सैनिकांनी मात्र वेगळा नवीन उपक्रम राबवून आपल्या आईला च सॅलूट करून, भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करण्यात आला त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता कटिबद्ध असल्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने विश्वास दाखविला .या वेगळ्या उपक्रमामध्ये् कु. मनस्वी कांबळे, तेजल डहाके ,कुमारी पूर्वा सोलव, कुमारी मधुरा किटे ,कुमारी प्रगती ठवळी ,कुमारी रेणुका कडू, कुमारी रितिका जाधव ,कु. तेजल राठोड, कुमारी ऋतुजा जामखूटे ,कृष्णा बोरकर वंश जयसिंगपुरे, ऋग्वेद निंभोरकर ,यश अहीव, तन्मय गुजर, हर्षल निनावे, अशा अनेक एन.सी.सी छात्रसैनिकांनी भाग घेतला. हा दिवस सर्वांच्या स्मरणात राहील हा उपक्रम राबविण्याकरता एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular