Friday, March 29, 2024
Homeवर्धाअवतार मेहेर बाबा चॅरीटेबल ट्रस्ट ,समुद्रपूर द्वारे मेहेर बाबाचा १२७ वा जन्मोउत्सव...

अवतार मेहेर बाबा चॅरीटेबल ट्रस्ट ,समुद्रपूर द्वारे मेहेर बाबाचा १२७ वा जन्मोउत्सव कार्यक्रम संपन्न


समुद्रपुर:
दरवर्षी प्रमाणे समुद्रपूर येथे अवतार मेहेर बाबाचा जन्मोउत्सव साजरा केला जातो. पण या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ट्रस्टने शासनाच्या नियमाचे पालन करून साध्या पध्दतीने जन्म उत्सोव साजरा करण्यात आला.


ता. २४ रोज बुधवारला सायंकाळी दिप प्रज्वलन मा. जेष्ट श्री नामदेवराव दविले यांचे हस्ते संपन्न झाले. तर सप्तरंगी झेंडयाचे ध्वजारोहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मोतीराम जिवतोडे यांचे हस्ते पार पडले. त्या नंतर प्रार्थना,आरती , प्रसाद वितरीत करण्यात आला.
ता. २५ रोज गुरुवारला सकाळी ५.०५ मि. मेहेर. नाम जपला सुरुवात झाली. त्या नंतर बाबाचा जन्म करण्यात आला. त्यात महिलांनी पाळणे म्हणुन जन्म उत्सव साजरा करण्यात आला. व प्रार्थना,आरती, प्रसाद वितरीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात शासनाच्या नियमांचे पालन करून डॉ. हेमंत ईसनकर यांनी दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे तापमान, व ऑक्झी मिटरने तपासणी केली. सदर कार्यक्रमात मास्क , व सॅनिटायझर चे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमात शोसल डिस्टन्स् , मास्क, सॅनिटायझर यांची पुर्णपणे अमलं बजावणी करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता, एकनाथ तपासे, विठ्ठल झाडे, अशोक कांबळे, बादल वानकर, हरिदास मंगेकर,प्रमोद चौधरी, अनुप अवचट, विठ्ठल भोयर, प्रिया बाभूळकर, संध्या ईसनकर, बाळाजी अडवे, यांनी परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular