Thursday, April 25, 2024
Homeवर्धाअमर्त्य सेन राष्ट्र सेवा दलाच्या फ्रायडेफ्लेम मध्ये ४ जून रोजी फेसबूक लाईव्ह...

अमर्त्य सेन राष्ट्र सेवा दलाच्या फ्रायडेफ्लेम मध्ये ४ जून रोजी फेसबूक लाईव्ह करणार

राजमोहन गांधी, गणेश देवी यांचा सहभाग
वर्धा:
आधीच आर्थिक संकट, त्यात जैविक आणि वैचारिक करोनाचे संकट. त्याचा सामना कसा करायचा या विषयावर नोबेल परितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन येत्या ४ जून रोजी भारतीयांशी फेसबूक लाईव्ह संवाद करणार आहेत.


राष्ट्र सेवा दलाने बायोलॉजिकल आणि आयडियोलोजिकल करोनाच्या विरोधात `फ्रायडेफ्लेम’ ऑनलाइन अभियान गेले ७ मे पासून महिनाभर चालवले आहे. ४ जून रोजी रात्री ८ वाजता होणार्‍या समारोपात डॉ. सेन बोलणार आहेत. महात्माजींचे नातू प्रा. राजमोहन गांधी अध्यक्ष असणार आहेत.

४ जून हा राष्ट्र सेवा दलाचा स्थापना दिन निर्धार दिन म्हणून साजरा केला जातो. सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे भाषा तज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या खास निमंत्रणावरून हे दोन्ही दिग्गज देशाला संबोधित करणार आहेत. देशभरातील सेवादल व समविचारी चळवळीतील कार्यकर्ते, लेखक, कलावंत आणि पत्रकार या कार्यक्रमात समाविष्ट झाले आहेत. सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी ही माहिती दिली.

मालिका साराभाई, नंदिता दास, इंदिरा जयसिंग, कन्हैया कुमार, अशोक वाजपीय, रावसाहेब कसबे, सईदा हमीद, निखिल वागळे, डॉ. झहीर काझी, नितिन वैद्य, एयर मार्शल मातेश्वरन, ओरदेता मेंडोसा, कपिल पाटील आदींनी आजवरच्या फ्रायडेफ्लेम मध्ये हजेरी लावली आहे.

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आणि बंधुता या संविधानिक मूल्यांशी कटिबद्धता राखत राष्ट्र सेवा दल काम करत आहे. कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रती सहवेदना आणि फॅसिझम विरोधात लोकशाही निर्धार व्यक्त करण्यासाठी ४ जून रोजी देशभरातील कार्यकर्त्यांनी एक दिवसाचा उपवास करावा असे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केले आहे. आतापर्यंत ११ हजार कार्यकर्त्यांनी नोंदणी केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular