Friday, April 19, 2024
Homeवर्धाअपघात टाळण्यासाठी वाहनांना लावले रिफ्लेक्टर,

अपघात टाळण्यासाठी वाहनांना लावले रिफ्लेक्टर,

वाहतूक शाखा व नॅशनल इंजीनियरिंग कंपनीचा उपक्रम ; विकास विद्यालयामध्ये जनप्रबोधन

समुद्रपुर:-
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा व नॅशनल इंजिनीयरींग कंपनीच्या संयुक्त विद्यमाने वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला तर विकास विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती देऊन जनप्रबोधन करण्यात आले.


वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे रस्त्यावर अनेकदा अपघात होतात जनतेमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण व्हावी व अपघातांची मालिका कमी व्हावी याकरिता पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखा व नॅशनल इंजिनिअरिंग कंपनी द्वारा रस्त्यावर धावणारे जड वाहन ,बैलगाडी ,एसटी बस ,चारचाकी वाहने, दुचाकी वाहने ,सायकल आदींना रिफ्लेक्टर लावण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक ,नादुरुस्त झालेले व रस्त्याच्यामध्ये उभे असलेले वाहनांना सुद्धा रिफ्लेक्टर लावण्यात आले. विकास विद्यालय , समुद्रपूर येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयीची माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास विद्यालयाचे प्राचार्य संजय उरकांदे होते. नॅशनल इंजीनियरिंगचे संचालक पवनकुमार,जयपालसिंग सुर्यवंशी , जितेंद्र वैद्य, प्रा. भास्कर थुटे, अंगद सेलकर, शिरीष नेहरोत्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. वाहतुक नियम व विद्यार्थ्यांची भूमिका विषद करण्यात आली. सर्व विद्यार्थी , शिक्षक यांच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले व मास्कचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन विशाखा घोडे यांनी तर आभार प्रदर्शन रजनी चंदनखेडे यांनी केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular