Friday, April 19, 2024
Homeवर्धाअचानक आग लागल्याने घर खाक

अचानक आग लागल्याने घर खाक

रोजमजुरी करणार कुटुंब पडलं उघड्या वर

तळेगाव :- तळेगांव येथील वॉर्ड क्र 5 काकडदरा येथे एका घराला अचानक आग लागल्याने या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरात असलेली रोख रक्कमही जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. तरी शासनातर्फे भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबाने केली आहे..
सविस्तर वृत्त असे की वॉर्ड क्र ५ मध्ये जानराव गणपतराव गूळभेले वास्तव्यास आहे. बुधवार २४ फेब्रुवारी रोजी रोजमजुरी ला गेले होते मात्र सायंकाळी ५ च्या दरम्यान कामा वरून परत घरी येताच आगीत घर खाक झालेलं दिसलं घराला आग लागल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. . ही आग कशी लागली याचा अंदाज अद्यापही लागला नाही. ह्या घटनेत घरात ठेवलेली रोख रकमेसह घरातील वस्तू जळून खाक झाली आहे .

या घटनेची माहिती तलाठी कौरती, उपसरपंच त्रिशूल भुयार याना देताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यांनी आगीत खाक झालेल्या घराची पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून एकूण ५१२०० रुपयांच नुकसान अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. अशी माहिती तलाठी कौरती यांनी दिली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular