Thursday, March 28, 2024
Homeयवतमाळशिळोणा घाटात मालवाहतुक वाहन जळून खाक

शिळोणा घाटात मालवाहतुक वाहन जळून खाक


मुळावा : उमरखेड-पुसद हा राज्यमार्ग २१३म्हणुन ओळखला जातो. हे दोन्ही शहरे तालुक्याचे ठिकाण असल्याने ह्या मार्गावर जास्त रहदारी चालु असते.

एखादा अपघात झाला असता हा राज्यमहामार्ग रस्ता जाम होत असतो. काल शुक्रवारी ७.३०च्या सुमारास पुसद वरून किराणा माल भरून मालवाहतुक गाडी क्रएम एच २६बीई १२०२ ही शिळोणा घाट चढत होती.

गाडीच्या इंजीन गरम झाल्यामुळे शाॅटसर्कीट झाल्याने मालवाहतुक वाहनाने पेट घेतला. ही बाब वाहकाच्या लक्षात येताच गाडी तुन उतरले. ठाणेदार कैलास भगत तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठुन अग्नीशामक दलाला पाचारण करुन आग आटोक्यात आणली. पं.स.उमरखेडचे विस्तार अधिकारी संतोष डाखोरे, देवानंद गायकवाड ,राहुल बोद्रे, वनरक्षक टोगळे,तानाजी कनवाळे,शिवाजी कनवाळे लोटागण महाराज हेमत बारसकर , बोरसे,आदी मंडळीने आग विझविण्यात मोलाचे सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular