Thursday, April 25, 2024
Homeयवतमाळलोकप्रतिनीधीचा वारसा जपणारा पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे

लोकप्रतिनीधीचा वारसा जपणारा पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे

उमरखेड : पंचायत समिती सभापती पदाची सत्ता सुत्रे स्विकारल्यानंतर पदाच्या मानाच्या खुर्चीवर न बसता ती खुर्ची लोकनेत्यांना अर्पण करीत त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन साध्या खुर्चीवर विराजमान होऊन कारभार हाकणारे सभापती प्रज्ञानंद खडसे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ चर्चेचा विषय ठरला आहे .


तालुक्याचे राजकिय दैवत म्हणून ओळखले जाणारे पं .स . चे सभापतीपद भुषविणारे स्व . नारायणराव पाटील वानखेडे. पं.स . चे पहिले सभापती माजी आमदार स्व. भाऊसाहेब माने यांच्या आदर्श कारभाराचा ठेवा असलेल्या सभापती पदाच्या खुर्चीला प्रेरणास्थानी मानले. त्या खुर्चीवर विराजमान न होता पंचायत समितीचा लौकीक कायम ठेवण्याचा सदोदित प्रयत्नशिल असणाऱ्या सभापती प्रज्ञानंद खडसे यांनी पं .स . शिक्षण विभागाअंतर्गत असलेला शिक्षक पुरस्कार १७ वर्षापासून बंद पडलेला असतांना यंदापासून सुरू करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. पं .स . च्या कारभारावर बारीक लक्ष ठेऊन आपला अडीच वर्षाच्या कार्यकाळातील एक आज ८ जानेवारी रोजी त्यांनी कुशलतापूर्वक वर्षपूर्ती केली आहे. तालुक्यातून दूरवरून येणाऱ्या गरजू गरीब लाभार्थ्याची कामे वेळ न दवडता कुशलतापूर्वक हाताळ्णारे प्रज्ञानंद खडसे यांच्या खुर्चीची तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular