Friday, March 29, 2024
Homeयवतमाळमांडवा ग्रामपंचायतीचे येथील ७ महिला सदस्य बिनविरोध

मांडवा ग्रामपंचायतीचे येथील ७ महिला सदस्य बिनविरोध

आमदार इंद्रनीलजी नाईक यांची मांडवावाश्यांवर कौतुकाची थाप

पुसद : तालुक्यातील मांडवा येथील ग्रामपंचायत निवडणूक गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने बिनविरोध करण्यात आली.मांडवा येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ आहे. त्यापैकी 7 महिला सदस्य बिनविरोध आले आहे.


आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मांडवा येथील महिलांची सदस्य संख्या ही ३ किंवा ४ असायची परंतु या २०२१ च्या निवडणुकीमध्ये मांडवा येथील ९ ग्रामपंचायत सदस्य संख्यापैकी संगीता देवीदास गजभार, कमल कैलास राठोड, कविता विठ्ठल आडे, जयश्री गजानन आबाळे, शालिनी हरीभाऊ धाड, अल्का रमेश ढोले, आरती बाळु पुलाते ७ सदस्य ह्या महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत .तसेच विजय फुलसिंग राठोड, गोपाल अरुण मंदाडे हे २ पुरुष या संबंधित सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुसद तालुक्यामधील मांडवा ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत असावी की जिथे ८० टक्के महिला आहेत.मांडवा ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आणून ९ सदस्यांपैकी ७ महिलांना प्राधान्य दिल्याबद्दल पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनीलजी नाईक यांनी निवडून आलेल्या सदस्यांचे तसेच समस्त मांडवावांश्यावर कौतुकाची थाप दिली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular