Friday, March 29, 2024
Homeयवतमाळबोरी अरब येथे ग्राम विकास आघाडी पॅनलचा विजय

बोरी अरब येथे ग्राम विकास आघाडी पॅनलचा विजय

परिवतॅन पॅनलचा धुवा

बोरी अरब : दारव्हा तालुक्यातील सर्वात मोठी 15 सदस्य असलेल्या बोरी अरब ग्रामपंचायत मध्ये दोन गट आमने-सामने उभे ठाकल्यांने रंगतदार निवडणुक झाल्याचे चित्र पहावयास मिळेल असे मतदारांना वाटत होते. परंतु विकास कामाच्या आधारित ग्राम विकास आघाडी लढ्ढा याच्या नेतृत्वात ग्राम विकास आघाडीचे 15 पैकी 12 उमेदवार विजयी झाले.यामध्ये परिवतॅन पॅनलचा धुवा उडाला आहे.

बोरी अरब येथील वार्ड़ क्र 1 मधून ममता लढढा, शोभा भगत, लक्ष्मण वांजरेकर, वार्ड़ क्र. 2 मधून अनिकेत बेलगमवार ,माला गरड , वार्ड़ क्र. 3 शंकर उर्फ बबलु जयसवाल , वार्ड़ क्र.4 ओमप्रकाश लढढा, आरती चव्हाण, मालु गायकवाड़ , वार्ड़ क्र 5 प्रफुल खडसे, शेख सोहेब, वनिता निबर्त विजयी झाले. तर
परिवतॅन पॅनलचे ज्ञानेश्वरी कळंबे ,अमोल इंगळे तर अपक्ष अनिता तिवारी हे विजयी झाले. छाननी, माघार नंतर दोन्ही पॅनलसह अपक्ष मिळुन 39 उमेदवार निवडणुकीमधे उभे ठाकले होते. यामधे पुरुष 20 तर महिला 19 उभे होते. 5 प्रभागात एकुण मतदार 6006 होते. त्यापैकी 4203 मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावला होता. ग्राम विकास आघाडी पॅनल लढढा गटाच्या विजयी उमेदवारांनी बोरीअरब गावातील गांधी पुतळा ,छत्रपती शिवाजी महाराज ,आंबेडकर पुतळा ,राम मंदिर, अरबशाह दरगाह ,हनुमान मंदिर ,विठ्ठल मंदिर दर्शन घेत रॅली काढुन गावकरी नागरिक मतदार राजांचे आशिर्वाद घेतले. यावेळी शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular