Tuesday, April 16, 2024
Homeयवतमाळपुसद आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम

पुसद आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम

पुसद : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे दि. १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी२०२१ या कालावधीत इंधन बचत मासिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाचे औचित्य साधुन महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे माजी केंद्रीय कार्याध्यक्ष तथा माजी वाहतुक नियंत्रक चंपत राठोड, आगार प्रमुख ए.एम.कोरटकर यांचे हस्ते फित कापुन उदघाटन करण्यात आले .आपला देश इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर नसुन बहुतांश इंधन साठा परदेशातुन आयात करावा लागतो. त्यामुळे सदर आयाती वर फार मोठा परकीय चलनाचा विनियोग करुन देशाला किंमत चुकवावी लागते. त्यामुळे इंधन बचत करणे गरजेचे आहे. इंधन बचत करणे हे कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचेच भाग नसुन प्रत्येक आम नागरिकांनी सुध्दा इंधण बचतीची संवय लावुन घेणे काळाची गरज आहे. या विषयावर उदघाटक चंपत राठोड वआगार प्रमुख कोरटकर यांनी आगारातील कामगाराना प्रबोधन केले. आगाराचे पर्यवेक्षक ए.एस. राठोड व गणेश मोहेकर यांनी सोप्या भाषेत इंधन बचतीचे महत्व कामगाराना समजाउन सांगीतले .कार्यक्रमाचे संचालन आगाराचे कनिष्ठ सहाय्यक अनिल राठोड यांनी केले. तर आभार वाहतुक नियंत्रक गणेश मोहोकर यांनी मानले. या कार्यक्रमाला चालक, वाहक, यांत्रीक व प्रशासकीय एस टी कामगाराची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular