Friday, April 26, 2024
Homeयवतमाळजिल्हा मध्यवर्ती बँक शेतक-याची- टिकाराम कोंगरे

जिल्हा मध्यवर्ती बँक शेतक-याची- टिकाराम कोंगरे

मारेगाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतक-यांची बँक आहे. यापुढे शेतक-याना बँकेत जोडे झिजवावे लागणार नाही. तर शेतक-यांना समृध्द करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून पुर्ण प्रयत्न करु असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी मारेगाव येथे बोलताना व्यक्त केले.


मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे व संचालक राजीव यल्टीवार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, प.स.सभापती शीतल पोटे जि.प.सदस्य अरुणा खंडाळकर,अनील देरकर वसंतराव आसुटकर शरिफ अहेमद शफिक अहेमद यादवराव काळे मारोती गौरकार आदी मान्यवर उपस्थीत होते
यावेळी सहकारी सस्थांच्या संचालकांनी शेतक-याच्या बँक विषयक अडचणी मांडल्या सत्काराला उत्तर देताना कोंगरे म्हणाले या पुढे शेतक-यावर बँकेत कर्जासाठी जोडे झिजवावे लागणार नाही. तर अल्प व्याजदरात शेतक-याना जास्तीत जास्त कर्ज कसे देता येईल या साठी प्रयत्न करणार आहे. शेतक-याचे सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.या सोबत बँकेच्या नविन विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती गौरकार, संचलन रविंद्र धानोरकर यांनी केले. तर आभार शंकरराव मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका काँग्रेस च्या पदाधिका-यानी परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular