Tuesday, April 16, 2024
Homeयवतमाळगणराज्य दिनी मारेगावात शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मार्च

गणराज्य दिनी मारेगावात शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मार्च

मारेगाव : येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान एकता मोर्चाच्या वतीने मारेगावात ट्रॅक्टर मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.


केन्द्र शासना कडुन शेतकरी बील पारीत करण्यात आल्या नंतर पंजाब व हरियाना राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत बिलाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. केन्द्र शासनाने मंजुर केलेले हे कृषी कायदे मागे ध्यावे या प्रमुख मागणीसाठी दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणुन मारेगाव तालुका किसान एकता मोर्चाचे वतीने भव्य ट्रक्टर मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव येथे २६जानेवारीला सकाळी १० वाजता स्थानिक नगरपंचायतच्या पटांगणावरुन आंदोलकाची सुरूवात होणार आहे. तालुक्यातील शेतकरी आप आपले ट्रॅक्टर घेऊन या मार्चमध्ये सहभागी होणार आहे. शेकडोंच्या संख्येने हा ट्रँक्टर मार्च शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात येवुन तहसील कार्यालया समोर धडकणार आहे. या ट्रँक्टर मार्चमध्ये मार्डी, कुंभा, खैरगाव, भालेवाडी, पिसगाव, पहापळ,वेगाव मारेगाव, मांगरुळ,करणवाडी,नवरगाव,बोटोणी,चिंचमंडळ, ईत्यादी गावातील शेकडो ट्रँक्टर धारक शेतकरी आप आपल्या ट्रँक्टर ला तिरंगा लावुन सहभागी होणार आहे. ये ट्रक्टर मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मारेगाव तालुका किसान एकता मोर्चाचे अनंत मांडवकर, मारोती गौरकार, गजानन किन्हेकर, ज्योतीबा पोटे, दुष्यंत जयस्वाल, आकाश बदकी, विशाल किन्हेकर, बंडु गोलर, श्रीकांत तांबेकर, श्रीकांत सांबजवार, भारत मत्ते, संतोष रोगे, प्रकाश कोल्हे, अनिल देरकर, राजु किन्हेकर, माणिक कांबळे, गजानन घागी, गजानन येरगुडे यांनी केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular