Friday, March 29, 2024
Homeयवतमाळउत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीकडून सक्तीने वसुली

उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीकडून सक्तीने वसुली

फायनान्स कंपनीचा परवाना रद्द करा, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यवतमाळ : कोरोना संसर्गजन्य रोगामुळे संपुर्ण राज्यासह देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असतांना मध्यमवर्गीय लोकांसमोर पैशांचा प्रश्न अधिक जटील बनला आहे. कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमान कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
हाताला काम नसल्या कारणाने सामान्य वर्गांचे आर्थिक स्त्रोत पुर्णपणे बंद आहेत .

परंतु याही परिस्थितीत जिवनाचा गाडा हाकण्याकरिता पैशांची थोडीफार मदत व्हावी याकरिता हे लोक मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दारात जाऊन थोडीफार कर्जाची मागणी करतात. आपल्या छोट्या छोट्या गरजा भागविण्यासाठी महिलांना त्वरीत कर्जाची रक्कम मिळते शिवाय दर आठवड्याला कर्जाचा हप्ता भरायचा या तत्वावर मायक्रो फायनान्स कंपन्या कर्ज वितरण करतात याच परिस्थितीचा फायदा घेत मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना कमीत कमी व्याजाचे आमिष दाखवून कर्ज देऊ करतात . हा प्रकार ग्रामीण भागात अधिक असून जिल्ह्यात हजारो महिला या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या ग्राहक आहेत . मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून प्रारंभी महिलांना आकर्षक कर्जाचे आमिष देत त्यांचे पाच सदस्यांचे गट पाडून कर्जाचे वितरण केल्या जाते . ग्रामीण भागातील महिलांच्या असुशिक्षीतपणांचा फायदा घेत या आकर्षक कर्जावर अव्वाच्यासव्वा दराने व्याजदर लावून पुढे वर्षानुवर्ष या कर्जाची मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटकडुन वसुली केल्या जाते . या कर्ज वितरणवेळी महिलांकडुन कर्जाचा अर्ज भरुन घेण्यात येतो या अर्जामध्ये अनेक अटी व नियमांमध्ये महिलांना बंधनात अडकविण्यात येते . तात्काळ कर्ज मिळते या कारणास्तव गरजेसाठी महिलांनी डोळे झाकुन या अर्जावर स्वाक्षरी व अंगठे लावतात . असाच काहीसा प्रकार शहरातील वाघापूर परिसरातील राऊत नगर भागात असलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स आणि बँकने चालविला आहे . शहरातील अनेक महिलांना कमी व्याजदराचे आमिष देऊन हजार रुपयांचे कर्ज देऊ की नाही मध्यंतरी लॉकडाऊन आणि कोरोनामुळे रोजमजुरी करणाऱ्या महिला वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचे हप्ते फेडणे कठिण होते ही सर्व परिस्थिती उत्कर्ष स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व वसुली अधिकाऱ्यांना माहित असतांना सुध्दा या कंपनीमार्फत महिलांना वसुलीसाठी रोज तगादा लावत आहे. या कंपनीवर कठोर कारवाई करुन जिल्ह्यात या कंपनीस हद्दपार करावे अशी मागणी या निवेदनातून स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी संघटनेचे रोशन मस्के, हरीश कामारकर, हृषीकेश सावळे, वैभव धामनवार, प्रणव राठोड, सनी ढाकरगे, महेश वाघमारे, ओम चंद्रवंशी, तौफिक पठाण, साहिल खान, विप्लव वाघमारे, रशीद शेख, जयंत वाघमारे, अरमान खान, यश किर्तक, देवानंद पंधरे, सोहेल खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular