Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमानवमुक्तीचा सिध्दांत जगाला देणारे पहीले वैज्ञानिक भगवान बुध्द .. ..हंसराज मोरे

मानवमुक्तीचा सिध्दांत जगाला देणारे पहीले वैज्ञानिक भगवान बुध्द .. ..हंसराज मोरे


काळी दौ .. मानवमुक्तीचा मार्ग शोध व दु:खाचा शोध घेण्याकरीता खडतर तपश्चर्या करून मानवमुक्तीचा शोध घेऊन त्या सिध्दांताची जगाला देणगी देणारे तथागत बुध्द पहीले वैज्ञानिक होते आजच्या परिस्थितीत जगाला युध्दाची नव्हे तर बुध्द विचाराची गरज आहे असे प्रतिपादन हंसराज मोरे यांनी बौध्द पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित बुध्द जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.


डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधीनीच्या वतीने आयोजीत संध्यासंदेश अभ्यासीकेत संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी कपील इंगोले प्रमुख पाहूणे म्हणून हंसराज मोरे शेख रेहान, संदेश रणवीर, कोमल श्रावणे, संतोष भालेराव, नामदेव श्रावणे, शीतल कांबळे हे होते.
तथागताच्या प्रतिमेच्या पुजनाने सुरू झालेल्या कार्यक्रमात अगदी घरगुती पध्दतीने बुध्दजयंती साजरी केली गेली.भाषणाच्या कार्यक्रमानंतर सोबतच नामदेव श्रावणे यांनी बुध्द जयंतीनिमित्त बुध्दगीत गायन करून उपस्थितांचे मनोरंजन केले
कार्यक्रमाचे संचालन राजू नरवाडे व आभार धम्मानंद बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधीनीने प्रयत्न केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

1 COMMENT

Most Popular