Thursday, March 28, 2024
Homeभंडारा6338 विद्यार्थी देणार जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा

6338 विद्यार्थी देणार जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा

11 ऑगस्टला जिल्ह्यातील 35 केंद्रावर परीक्षेचे आयोजन
भंडारा-


केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील एकमेव जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव मध्ये इयत्ता सहावी प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा 11 ऑगस्टला सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 यावेळेत होणार आहे. जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 35 परीक्षा केंद्रातून 6338 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला समोर जाणार आहेत. या परीक्षेसाठी भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत.
भंडारा तालुक्यातील लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा, प्रकाश हायस्कूल कारधा, नानाजी जोशी स्कूल शहापुर, जकातदार हायस्कूल भंडारा, जेसिस कॉन्व्हेंट भंडारा, नूतन कन्या विद्यालय भंडारा, मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी, जिल्हा परिषद हायस्कूल वरठी, जिल्हा परिषद हायस्कूल आंधळगाव, सुलोचना देवी पारधी विद्यालय मोहाडी, गुरुदेव चिंतामण बिसने हायस्कूल मोहाडी, तुमसर तालुक्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय तुमसर, नगर परिषद नेहरू विद्यालय तुमसर, जनता विद्यालय तुमसर, आदर्श विद्यालय सिहोरा, महर्षी विद्या मंदिर तुमसर, यु एस ए विद्यामंदिर तुमसर, साकोली तालुक्यात एन. पी. विद्यालय साकोली, जिल्हा परिषद हायस्कूल सानगडी, जिल्हा परिषद हायस्कूल साकोली, नवजीवन हायस्कूल जमनापुर, लाखनी तालुक्यात जिल्हा परिषद गांधी हायस्कूल लाखनी, गोविंद विद्यालय पालांदूर, समर्थ विद्यालय लाखनी, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा लाखनी, लाखांदूर तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल लाखांदूर, जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूर, महात्मा गांधी विद्यालय चिचाळ, शिवाजी विद्यालय लाखांदूर, सुबोध विद्यालय मसाळ, पवनी तालुक्यात वैनगंगा विद्यालय पवनी, नगर परिषद हायस्कूल, प्रकाश हायस्कूल अड्याळ, विकास हायस्कूल पवनी, गांधी हायस्कूल कोंढ या केंद्रांवर परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्याअशी माहिती जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव भंडारा चे प्राचार्य सम्राट टेंभुर्णीकर यांनी दिली आहे. www.navodaya.gov.in या संकेत स्थळावर जाऊन प्रवेश पत्र प्राप्त करावे. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9425139090 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य सम्राट टेंभुर्णीकर यांनी केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular