Thursday, March 28, 2024
Homeभंडारास्त्रीभृण हत्या करणाऱ्यांचे नाव कळवा आणि रोख 1 लाख मिळवा

स्त्रीभृण हत्या करणाऱ्यांचे नाव कळवा आणि रोख 1 लाख मिळवा

भंडारा :
गर्भलिंग परिक्षण करून भृण मुलगी असल्यास तिला गर्भातच मारले जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच गर्भलिंग परिक्षण करण्यास प्रवृत्त करणे, प्रेरित करणे व अशा कार्यात सहभाग दर्शवणे, मदत करणे देखील कायद्याने गंभीर गुन्हा आहे.

ज्याकरिता गुन्हेगारास 3 वर्षापर्यंत सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. भंडारा जिल्ह्यात सोनोग्राफी सेंटर आणि वैद्याकडून कायद्याचा भंग होत असेल तर त्याबाबत खबर देणाऱ्या व्यक्तीस रुपये 1 लाख एवढी रक्कम पारितोषीक म्हणून ठेवण्यात आली आहे. सदर पारितोषीक खबर खरी ठरल्यानंतर देण्यात येणार आहे. खबर देणाऱ्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे.
स्त्रीभृण हत्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय भंडारा येथे दुरध्वनी क्रमांकावर 07184-252247 संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक 102 व 18002334475 किंवा www.amchimulgi.gov.in यावर ई-मेल करावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांनी केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular