Friday, April 19, 2024
Homeभंडारासावधान..फोन-पे वर आर्थीक फसवणुकीचे नविन तंत्र सज्ज !

सावधान..फोन-पे वर आर्थीक फसवणुकीचे नविन तंत्र सज्ज !

• जिल्ह्याची गुप्त यंत्रणा अनभिज्ञ ; समय सुचकतेने युवकाला वाचविले
बाय लाईन – अमित रंगारी

तुमसर :
सध्या डिजिटल माध्यमातून होणा-या व्यवहाराकडे लहाणांपासून ते मोठ्यांनी, मध्यम वर्गीयांपासून ते धनाड्यांची धाव एक सामान्य बाब झाली आहे. खरेदी केलेल्या वस्तूंचे क्षणात बिलींग करुन मोकळे करणारी मोबाईल अॅप्स सध्या सर्वांच्या मोबाईवर डाऊनलोड असतेच, मात्र त्यातून संभाव्य धोके, आर्थिक फसवणूक, डेटा हॅकिंग, अनाम खरेदीवर झालेले बिलींग याचा फटका कधी-न-कधी ते वापरणा-याच्या अंगलोट आल्याच्या तक्रारी कुणासाठी नविन राहिलेल्या नाही. तसाच प्रकार तुमसर शहरात एका औषधी विक्रेत्यासोबत होताना समय सुचकतेने बचावल्याची घटना समोर आली आहे. मात्र तंत्रविज्ञानाची जाणीव असलेल्या त्या औषधी विक्रेत्याला आर्थिक फसवणुकीचा तो नविन प्रकार वाटल्याने त्याने प्रतिनिधीला काॅल करुन सांगितला आहे. त्या प्रकाराची चौकशी करताच ‘फोन-पे’ वर आर्थिक फसवणुकीचे नविन तंत्र सज्ज झाल्याचे त्यानुन दिसत आहे. त्या अॅप वापरणा-यांनी सध्या सावध राहण्याची गरज त्या औषधी विक्रेता अभिनव कावळे यांनी व्यक्त केली आहे.


प्रत्येक हातात मोबाईल व त्यात इंटरनेटची सुविधा ही आजची वस्तूस्थिती आहे. त्यातून आर्थिक व्यवहार सुरळीत व कमी वेळात होण्याकरीता प्रत्येक मोबाईल धारक तसे अॅप्लिकेशन्सही सहज डाऊनलोड करुन घेतात. मात्र प्रत्येक मोबाईल आपल्या सुरक्षा दृष्टिकोणातून ‘थर्डपार्टी हस्तक्षेप’ असल्याची पुर्व सुचना मॅसेजच्या माध्यमातून स्क्रिनसमोर येतो. त्याच पार्श्वभूमिवर फोन-पे हे अॅप्लिकेशन काम करते. याच अॅपच्या नोटीफिकेशन टॅबवर अभिनवला सोमवारला एक संदेश आला. त्यात त्याला ४९०० रुपयांचे कॅश रिवार्ड(पारितोषिक) मिळाल्याचे दिसले. तसे मॅसेज येताच अभिनवला ‘फोन-पे’ कंपनीकडून बोलत असल्याचे काॅलही आले. काॅल करणा-या व्यक्तिने अभिनवला ते रिवार्ड प्राप्त करण्याकरीता त्यावर क्लिक करुन पासवर्ड घालण्यास सांगतले. मात्र समय सुचकतेने अभिनव त्यात आर्थिक फसगती पासुन बचावला.
फोन-पे वरील आर्थिक फसवणुकीपासून अभिनव वाचला असला तरी, एखाद्या प्रख्यात अॅपवर अश्या प्रकारचे नोटीस येणे, यावर तो आश्चर्यचकित झाला. येथे फसवणुकीचा हा नविन प्रकार असल्याचे समजत आहे. फोन-पे वरील उपभोक्त्याची गुप्त माहिती जसे मोबाईल नंबर व त्यासोबत लिंक असणारे बॅंक खाते अनाम टोळीला कोण पुरवतो? त्यात गुगल प्ले स्टोअरने पळताळणी करुनच डाऊनलोडकरीता उपलब्ध केलेल्या ह्या अॅपवर अनाम नोटीस कोण पाठवतो? येथे खुद्द फोन-पे उपभोक्त्यांची खाजगी माहिती तर लिक करत नाही? याबाबतीत जिल्ह्याची गुप्त यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे समजून येत आहे. त्यात खरेदी न करताच घरापर्यंत पार्सल येऊन आर्थिक पसवणुकीच्या तक्रारी होत असतांना एखाद्या नावाजलेल्या अॅपवर चक्क नोटीफिकेशनच्या माध्यमातून वापरले जाणारे हे नविन तंत्र येत्या काळात अनेकांची फसवणूक करणारे भासत आहे. यावर जिल्हा पोलीस प्रशासनाने तश्या सुचना समाज माध्यमावरून व्हायरल करुन जन जागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular