Friday, March 29, 2024
Homeभंडाराव्हॅक्सिन विना तिसरी लाट रोखणार कशी ?

व्हॅक्सिन विना तिसरी लाट रोखणार कशी ?

भंडारा :
कोरोनाच्या डबल म्युटेशन तिसऱ्या लाट येण्याची शक्यता WHO ने वर्तवली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती सुरू आहे. ऑक्सिजन युक्त बेड तयार करणे सुरू आहे. परंतु जिल्ह्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, व्हॅक्सिन विना तिसरी लाट चा सामना असा प्रश्न निर्माण झाला .


जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. लसीचा साठा उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण प्रभावित झाले आहे , संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हंटले आहे आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटे दरम्यान कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे.
प्रत्येक तालुक्यातही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु कण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
संकट टाळण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने अदानी समूह हा प्लांट उभारणार असून, तीन महिन्यांत तो कार्यान्वित होणार आहे. जवाहरनगर येथील आयुध निर्माणित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तयारी होत आहे आहे. पण व्हॅक्सिनचा तुटवडा लसीकरण मोहिमेत समस्या ठरणार आहे.
शासना मागणी नुसार लस पुरवठा करून देत नाही . त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला नियोजन करताना कमी पडत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेची गतीही मंदावली आहे. कोविडची तिसरी लाट येण्या अगोदर जिल्ह्याला अधिक लस साठा मिळून प्रयत्न करणे
लसीच्या उपलब्धते अभावी लसीकरण तूर्तास थांबविण्यात आले – संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा
लसीबाबत समाजमाध्यमांवर उलटसुलट पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. त्यावर विश्वास न ठेवता लस घ्यावी. लस सुरक्षित असून कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. १८ ते ४४ वयोगटासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र लसीच्या उपलब्धते अभावी या गटाचे लसीकरण शासनाच्या सुचनेनुसार तूर्तास थांबविण्यात आले आहे. ४५ वर्षावरील १ लाख ६७,९८२ नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३५ हजार ४०२ एवढी आहे. त्यामुळ सध्या शिल्लक असलेल्या व्हॉयल या केवळ या वयोगटाकरीता राखीव ठेवल्या आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular