Friday, March 29, 2024
Homeभंडाराराष्ट्रीय मजुर कांग्रेस व प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान कार्यकर्ता मेळावा संपन्न

राष्ट्रीय मजुर कांग्रेस व प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान कार्यकर्ता मेळावा संपन्न

भंडारा :
राष्ट्रीय मजुर कांग्रेस व प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान जिल्हा भंडारा च्या माध्यमातुन मजुर व कलावंत यांचा संयुक्तीक मेळाव्याचे आयोजन प्रगती महिला विद्यालय नागपुर रोड भंडारा येथे दुपारी बारा वाजता इंटकचे जिल्हा अध्यक्ष मा धनराज साठवने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र प्रदेश प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा प्रकाश अवचार, इंटकचे नागपुर जिल्हा अध्यक्ष मा विनोदभाऊ पटोले होते तर मुख्य अतिथि म्हणुन भंडारा जिल्हा कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष मा मोहनभाऊ पंचभाई, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता मा. महादेवजी मेश्राम, जेष्ठ पत्रकार देवानंद नंदेश्वर, प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे भोनाजी ठोंबरे, भंडारा शहर निरीक्षक धनंजय तिरपुडे, लोकशाहीर सवितराव गजभिये, कलावंताचे अध्यक्ष शिवदास वाहाणे, लोकशाहीर अंबादासजी नागदेवे, इंटकचे जिल्हा उपाध्यक्ष जिवन भजनकर, इंटकचे जिल्हा संघटन सचिव श्रीकांत येरपुडे, सुरेश गोन्नाळे, इंटकच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ सुनंदा धनजोडे, कलावंताच्या जिल्हा संघटिका कुंदाताई भदाडे, इत्यादि मान्यवर मंचावर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातिला राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मेनबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करुन मानवंदना देण्यात आली.
यानंतर ज्या मान्यवरांनी सामाजीक, राजकीय, वर्तमान पत्र, साहित्यिक, कलावंत अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली. त्यांचे शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता मा. महादेवजी मेश्राम वैशाली नगर भंडारा यांनी करोना काळात जिल्ह्याच्या ब-याच जनतेला उदर निर्वाहाचा सामान उपलब्ध करुन दिला व शिंगोरी या ठिकाणी जनतेचच्या सेवेकरीता स्वखर्चानी समाज भवन बांधुन दिला या प्रित्यार्थ त्यांचा जंगी सामाजिक सत्कार करण्यात आला. जेष्ठ पत्रकार देवानंद नंदेश्वर यांना त्यांच्या पत्रकारीतेच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. लोकशाहीर सवितराव गजभिये, अंबादासजी नागदेवे, शिवदास वाहाणे,सौ कुंदाताई भदाळे यांना त्यांच्या समाज प्रबोधनाकरिता, कामगार नेता विनोदजी पटोले यांना मजुरांच्या मदतिकरीता, व मोहनभाऊ पंचभाई, प्रशांत देशकर यांना राजकारणातुन जनतेची सेवा करण्याकरीता त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर कलावंत प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा प्रकाश जी अवचार साहेब यांनी कोरोना काळात कलावंताला आलेल्या अडचणी व येणा-या काळात कलावंताची आर्थीक मदत सरकारव्दारे कसी करण्यात येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. नागपुर जिल्हा इंटक चे अध्यक्ष विनोदभाऊ पटोले यांनी मजुर कामगार यावर मार्गदर्शन करतांना म्हणाले केंद्र सरकार हि मजुर, कामगार यावर अन्यायकारक बंधने लादत असुन मजुरांचे हित जोपासणा-या चौरेचाळीस कायद्यांचे फक्त चार कायद्यात रुपांतर केले व आता पुढिल महिण्यांच्या एक तारखेपासुन मजुरांना आठ तास काम करण्या एैवजी बारा तास काम करावे लागणार आहे. म्हणजेच मजुर कामगार व शेतक-यावर केंद्र सरकार अन्यायच करत आहे. कांग्रेस कमेटी चे जिल्हा अध्यक्ष मा मोहनभाऊ पंचभाई म्हणाले कि मजुर कामगार व शेतकरी हां देशाच्या पाठीचा कणा असुन मजुर शक्ती ही देशाचा आधार स्तभं आहे. व या आधार स्तंभाला कमजोर करुन केंद्र सरकार हि देशाच कंम्बरड मोडुन उद्योग पती यांच्या स्वाधिन देश करायला निघाली कार्यक्रमाला सर्वपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular