Friday, April 19, 2024
Homeभंडारामृत जनावरे फेकली उघड्यावर , नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मृत जनावरे फेकली उघड्यावर , नागरिकांचे आरोग्य धोक्यात


लाखनी :-


गोपालन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी त्यांचेकडे असलेली जनावरे मृत पावल्यास शवविच्छेदन करून पुरावे. अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्या तरी यास या संस्थांकडून बगल दिली जाते. याचा प्रत्यय रेंगेपार/कोहळी येथे आला. मातोश्री गोशाळा संचालक यादोराव कापगते यांनी मेलेली जनावरे उघड्यावर फेकली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असले तरी यावर ग्रामपंचायत प्रशासनाने कसलीही उपाययोजना केली नाही.


कत्तलखान्यात जाणारी पाळीव जनावरे गोरक्षक किंवा पोलिसांकडून पकडुन पालन-पोषणाकरिता गोवंशरक्षक स्वयंसेवी संस्थांना दिली जातात. रेंगेपार/कोहळी येथे मातोश्री गोशाळा २००९ पासून कार्यरत आहे. पण या गोशाळेमध्ये गोवंशाची योग्य ती देखभाल केली जात नाही. चारा-पाण्याअभावी अनेक पाळीव जनावरे दगावून मृत्यूमुखी पडतात. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच पोलिसांनी गोतस्करी करणारा ट्रक पकडल्यानंतर या गोशाळेमध्ये आणली जातात. ट्रॅक मध्ये मृत पावलेली जनावरे गोशाळेलगत असलेल्या सरकारी गट क्रमांक २०७ मध्ये उघड्यावर फेकून दिली जातात. त्यांचे पशूवैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन केले जात नाही. हा गोरखधंदा मागील ७ ते ८ वर्षापासून सुरू आहे. गो-शाळेलगतच इंदिरा नगर ही मनुष्य वस्ती असून मृत जनावराच्या दुर्गंधयुक्त वासामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे मार्गावर असले तरी ७२ तासाचा कालावधी लोटून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने कसलीही उपाययोजना केली नसल्यामुळे गावकऱ्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील वर्षी २३ जुलै २०२० रोजी असाच प्रकार उघडकीस आला होता. तहसीलदार , ठाणेदार , पशूवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक कर्मचाऱ्यांना महसूल , आरोग्य , पशूसंवर्धन विभागाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. अहवालही पाठविण्यात आला. पण या गोशाळा संचालकावर कसलीही कारवाई केली गेली नाही.
प्रथम नागरिक गेले कुठे ?(चौकट)
ग्रामपंचायतीचे हद्दीतील सरकारी जागेचे संरक्षण व संवर्धन करणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे. गोशाळा संचलकाने मृत जनावरे उघड्यावर फेकली असल्याने दुर्गंधीमुळे वातावरण प्रदूषित होण्याचे मार्गावर आहे. या प्रकाराने गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी ग्रामपंचायतीने कसलीही उपाययोजना केली नसल्यामुळे प्रथम नागरिक आहेत कुठं ? असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे.
गोशाळा संचालक व अधिकाऱ्यांची मिलीभगत(चौकट)
गोशाळा संचालकाकडून गोशाळेतील जनावरांची योग्य ती देखभाल केली जात नसल्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात. मृत जनावरे उघड्यावर फेकली जातात. याचा गावकऱ्यांना अकारण त्रास सहन करावा लागतो. याबाबद अनेकदा गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. चौकशी करिता अधिकारी येतात पण अर्थपूर्ण संबंधामुळे प्रकरण थंड्याबस्त्यातच ठेवले जाते. संवेदनशील प्रकरणी हयगय करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)
मातोश्री गोशाळेत मृत पावलेली ७ ते ८ जनावरे सरकारी जागेत फेकण्यात आली. याबाबद उपाययोजना करण्याची संचालक मंडळास तोंडी सूचना केली आहे व प्रशासनाकडेही लेखी तक्रार करणार आहे.
मनोहर बोरकर सरपंच ग्रा. प. रेंगेपार/कोहळी

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular