Friday, April 19, 2024
Homeभंडारामित्रपरिवारचे संयोजक दिलीप नंदनवारची महावितरणकडे तक्रार

मित्रपरिवारचे संयोजक दिलीप नंदनवारची महावितरणकडे तक्रार

चक्क गावचा उपसरपंचच शेत शिवारात आकडा टाकून करतोय वीज चोरी

लाखनी –
शहर आणि ग्रामीण भागात वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. एकीकडे नियमित वीज बिल भरूनही अनेकांना वीज पुरवठा आखंडित होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे काही महाभाग विद्युत तारांवर आकडे टाकून वीज चोरी करतात. मात्र महावितरण अशा चोरट्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. लाखनी तालुक्यातील पालांदूर गावातील उपसरपंच आपल्या शेतातील बोरवेल सुरू करण्यासाठी विद्युत तारेवर आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचा प्रकार मित्र परिवाराचे संयोजक दिलीप नंदनवार यांनी उघडकीस आणला आहे.


गावचे उपसरपंच हेमराज कापसे यांची पालांदूर शिवारात गट क्र. २११/२ व ७२४/२ मध्ये अनुक्रमे ०.५८ हे. आर. व ०.२२ हे. आर. शेतजमीन आहे.
याच शेत शिवारातील जमिनीत
याबाबत दिलीप नंदनवार यांनी वीज चोरी होत असल्याच्या प्रकाराचा लाईव्ह व्हिडिओ थेट महावितरणच्या अधिकाऱ्याकडे व्हाॕट्सअप द्वारे पाठवून तक्रार केली आहे. चोरीचा प्रकार गंभीर असून या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.या तक्रारीची महावितरणचे कनिष्ठ अभियंता मयंक सिंग यांनी तात्काळ दखल घेऊन वीजचोरी होत असलेल्या शेत शिवारात लाईनमन बारी यांना पाठविण्यात आले.
मौका चौकशीत तक्रारीमध्ये सत्यता आढळून आल्याने लाईनमन बारई यांनी आकडा टाकलेला वायर जप्त केला व पुढील कारवाई करीता प्रकरण सहाय्यक अभियंता लाखनी यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.
*स्टेटमेंट/प्रतिक्रिया (चौकट )-
“वीज चोरीची तक्रार प्राप्त होताच संबंधित ठिकाणी लाईनमणला कारवाई करीता पाठविले आहे. संबंधितावर दंड करण्याचे अधिकार सर्वस्वी सहाय्यक अभियंता लाखणी यांना असल्याने उर्वरित कारवाई ते करतील.”
मयंक सिंग कनिष्ठ अभियंता पालांदूर/चौ

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

2 COMMENTS

Most Popular