Friday, April 19, 2024
Homeभंडाराभंडारा शहरातिल ट्राफिक सिग्नल सुरु करुन जड वाहनांची वाहतुक बंद करा

भंडारा शहरातिल ट्राफिक सिग्नल सुरु करुन जड वाहनांची वाहतुक बंद करा

भंडारा :


भंडारा शहरातिल ट्राफिक सिग्नल ब-याच दिवसापासुन बंद पडले आहे. भंडारा शहरात शास्त्री चौक, अण्णाभाऊ साठे चौक, मुस्लिम लायब्रेरी चौक, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ति चौक, जिल्हा परिषद चौक या चौकात शाशकिय नियमाच्या अधिन राहुन भंडारा नगर परिषदेने ट्राफिक सिग्नल ची व्यवस्था केली आहे. तसेच झेब्रा क्रासिंग सुध्दा निर्मान केलं आहे. परंतु आता पर्यत पोलिस विभागाकडुन या ठिकाणी ट्राफिक पोलिसांची नियुक्ति का झाली नाही असी विचारणा शहर कांग्रेस कमिटीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना विचारले असता पोलिस अधिक्षक साहेब यांनी नगर परिषदेने ट्राफिक नियमाच्या अधिन न राहता किंवा पोलिस विभागासी कुठलेही विचारपुस न करता आपल्याच मनानी झेब्रा क्रासिंग व ट्राफिक सिग्नल लाईट लावले. त्यामुळे पोलिस विभागाला दळन वळन आटोक्यात आनने मुश्किलीचे होत आहे. तसेच नागपुर रोड ते राजीव गांधी चौक रस्ता जड वाहना करीता बंद करा असे कांग्रेस कमेटी च्या पदाधिकारी यांनी मागणी करताच, त्यांनी त्या रस्त्याच निरीक्षण करुन रस्ता बंद करण्याचे आश्वासन दिले. तरी येत्या २३ / ८/ २०२१ ला बि एन्ड सी, नगर परिषद, ट्राफिक पुलिस विभाग, व शहर कांग्रेस चे अध्यक्ष मा प्रशांतभाऊ देशकर व पदाधिकारी यांची सामुहिक सभा घेऊन मार्ग काढु असे आश्वासन पुलिस अधीक्षक मा. जाधव साहेब यांनी दिले. या शिष्ठमंडळात जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ता शेख नवाब, महेमुदभाई, जिल्हा महासचिव अनिक जमा पटेल, इंटकचे जिल्हा महासचिव महेंद्र वाहाणे, इंटकचे जिल्हा उपाध्यक्ष जिवन भजनकर, शहर कांग्रेस कमेटीचे महासचिव सुरेश गोन्नाळे, उपाध्यक्ष प्रकाश डोनेकर, शहर महासचिव इम्रान पटेल, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष रिजवान काजी, कपिल रंभाळ, वेदांत मुने, इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या भेटिची चर्चा जवळ पास चाळीस ते पंचेचाळीस मिनीटे चालली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular