Thursday, April 25, 2024
Homeभंडाराप्रकल्पातील जलसाठ्याची पातळी 17 टक्के शिल्लक

प्रकल्पातील जलसाठ्याची पातळी 17 टक्के शिल्लक

भंडारा :
जिल्ह्यातील सिंचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 63 लहान-मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्याची पातळी सध्या चांगलीच रोडावली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी प्रकल्पांमधील साठ्याची टक्केवारी खाली आली असून आजच्या घडीला 17 टक्के आणि तेवढी शिल्लक आहे. वेळेवर व मुबलक पाऊस न पडल्यास शेतीच्या हंगामासाठी हा जलसाठा चिंतेचा विषय ठरू शकतो, अशीही शक्यता आहे.


जिल्ह्यातील मुख्य पिके भाताचे असून भात पिकासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. कधीकाळी भंडारा जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जात होता. मात्र आज तलाव नष्ट झाल्याची स्थिती आहे. जे काही तलाव शिल्लक आहेत, त्यांची योग्य रीतीने निगा राखली न गेल्याने पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. तरीही जिल्ह्यात लघू, मध्यम आणि माझी मालगुजारी तलावांच्या माध्यमातून सिंचनाचा आणि आवश्यक तिथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. लघु पाटबंधारे विभाग राज्य स्तर यांच्या अखत्यारित तीनही प्रकारचे मिळून 63 प्रकल्प येतात. आजच्या घडीला मध्यम प्रकल्पात 16 टक्के, लघू प्रकल्पात 20 आणि मामा तलावांमध्ये 13 टक्के असा तीनही प्रकल्प मिळून 17 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अनेक प्रकल्पांमध्ये केवळ मृत जलसाठा असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दरम्यान 5 जुलै रोजी जिल्हातील जलसाठ्याची ही आकडेवारी 2020 च्या पाच जुलैला 26 टक्के एवढी होती. त्यामुळे सिंचनासाठी या तलावाकडे पाहणाऱ्यांना चिंता वाटणे सहाजिक आहे. पावसाळा सुरू असला तरी सध्या पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. खरिपाचा हंगाम सुरू होऊन पेरणीला सुरुवात झाली आहे. किंवा तिला पडलेल्या पावसाकडे पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हातात घेतली मात्र आता पावसाने दडी मारल्याने झालेली पेरणी वाया जाण्याची भीती आहे. अशात या प्रकल्पांमध्ये पाणी राहणार नसेल तर दुहेरी अडचण शेतकऱ्यांपुढे राहण्याची शक्यता आहे. वाढण्याच्या दृष्टीने मुबलक आणि वेळेत पडणारा पाऊस महत्त्वाची भूमिका निभावणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular