Friday, March 29, 2024
Homeभंडारानोकरीच्या नावाखाली वेबसाइटच्या प्रलोभनांना बळी पडू नये :

नोकरीच्या नावाखाली वेबसाइटच्या प्रलोभनांना बळी पडू नये :

वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा
भंडारा :
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला असून, बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच बेरोजगारांना फसविण्यासाठी अनेक जण विविध फंडे वापरत आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची माहिती हस्तगत करण्यासाठी डमी वेबसाइट तयार करून त्याद्वारे पैशांची ऑनलाइन मागणी केली जाते. यामुळे सुशिक्षित तरुणांनी ही वेबसाइट ओळखून विशिष्ट आर्थिक व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे.


ऑनलाइनच्या माध्यमातून नोकरीसाठी होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारी होत आहेत. काही दिवसांपूर्वी तुमच्या घरी ऑनलाइन पार्सल आले आहे. तुमचा मोबाइल नंबर सांगा, त्यावर आला असेल ‘तो’ ओटीपी पाठवा, तत्काळ पार्सल तुमच्या घरी येईल, असे सांगून एका महिलेच्या खात्यावरील तब्बल एक लाख रुपये काठण्यात आले होते. अशा घटना वाढत असल्याने तरुणांसह महिलांनी विशेष दक्ष राहण्याची गरज आहे. कोरोनापूर्वी रोजगाराच्या संधी चांगल्या होत्या. मात्र, आता त्या तुलनेत रोजगाराच्या संधी कमी झाल्या असल्याने फसवणुकीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीच्या जाहिरातीची खात्री करून व्यक्तिगत माहिती देताना काळजी घेऊन ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे.
बॉक्स
• वेबसाइट ऑनलाइनची खातरजमा
ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळत असेल तर त्या वेबसाइटची संपूर्ण माहिती ऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून घेऊन त्याची आणि या कार्यालयामार्फत ती खात्री करावी.ऑनलाइनवरून नोकरी शोधत असताना अनेकदा पैशांची मागणी कोणीही केली तरी त्याला बळी पडू नये. यासाठी आपण सावध राहणे गरजेचे आहे.कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधून खातरजमा केल्यास आपली फसवणूक होणार नाही.
• कोणीही ओटीपी, व्यक्तिगत माहिती अनोळखी व्यक्तीला फोनवरून देऊ नये
एक तर तरुणांना कोरोनामध्ये नोकरीच्या संधी मिळत नसल्याने अनेकांना नोकरीची गरज आहे. शिक्षित सुशिक्षित बेरोजगार आपल्या मोबाइलवरून विविध माहिती मिळवितात. आज सर्वांकडे अँड्रॉइड मोबाइल असल्यामुळे ऑनलाइनचा वापर जास्त होत आहे. याचे फोनच डमी वेबसाइट तयार करणारे याच संधीचा फायदा घेऊ शकतात.ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक जण माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून नोकरीचे आमिष दाखवून फोन करतात, तसेच अशावेळी फोन आल्यास त्याची खातरजमा करून माहिती घेण्याची गरज आहे. वारंवार अनोळखी व्यक्ती फोन करून माहिती घेत असल्यास फसवणुकीचा धोका ओळखून सावध राहावे.एखाद्या कंपनीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीकडून नोकरी लावून देण्याचे आमिष असल्यास त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने पैशाची मागणी केली जाते. अशा वेळी खातरजमा करून घेत बनावट वेबसाइट तयार करून तरुणांना फसविण्यासाठी काही जण ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगू शकतात, कोणीही ओटीपी, व्यक्तिगत माहिती अनोळखी व्यक्तीला फोनवरून देऊ नये.नोकरीच्या नावाखाली प्रलोभनांना बळी पडता कामा नये. संकेतस्थळाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा. अनोळखी व्हाॅट्सॲपवर येणाऱ्या लिंक अथवा संकेतस्थळावर जाण्याचे टाळा. धोकादायक आणि फेक संकेतस्थळांना अँटिव्हायरसद्वारे ब्लॉक करावे. असे आव्हान वसंत जाधव यांनी केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular