Friday, March 29, 2024
Homeभंडाराजिल्ह्यात 6 लाख नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

जिल्ह्यात 6 लाख नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

भंडारा :
कोविड 19 आजाराचा सामना करण्यासाठी ‘लस’ हाच एकमेव उपाय असून शासनाने नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवित आहे. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाने वेग धरला असून लसीचा पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 6 लाखाच्या वर गेली आहे. जिल्ह्यात 6 लाख 7 हजार 425 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.


सर्व नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली असून विशेष शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. ‘एकच मिशन, लसीकरण’ या ध्येयाने संपूर्ण यंत्रणा काम करत असून जिल्ह्यात आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 7 लाख 84 हजार 513 एवढी झाली आहे. यापैकी 6 लाख 7 हजार 425 व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 77 हजार 88 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. पात्र लाभार्थ्यांची संख्या 9 लाख 65 हजार आहे.
अ.क्र. तालुका पहिला डोस दुसरा डोस एकूण
1 भंडारा 139846 53471 193316
2 लाखांदूर 57061 14045 71106
3 लाखनी 86345 23755 110100
4 मोहाडी 79039 18479 97517
5 पवनी 79538 20215 99753
6 साकोली 77950 21711 99660
7 तुमसर 87647 25413 113060
एकूण 607425 177088 784513

• ‘लस’ हाच कोरोनावर एकमेव उपाय आहे. सध्या युनायटेड किंगडम मध्ये तिसरी लाट सुरू आहे. या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे बाधितांची संख्या तीस टक्क्यांनी खाली आली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 95 टक्क्यांनी कमी झाले आहे. यावरून लसीकरणाचे महत्व लक्षात येते. आपल्याकडेही तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ‘लस’ घेणारे व्यक्ती धोक्याबाहेर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

• फोटो कॅप्शन:- 96 वर्षीय आजी यशोदाबाई देवाजी कांबळे यांनी शुक्रवारी वार्ड पवनी येथील ज्ञानांकुर बोध्द विहार येथे प्रथम डोज घेऊन लसीकरण करून घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular