Thursday, March 28, 2024
Homeभंडाराआत्मिक समाधान जपुन समाजकार्य करणारा मॅकेनिक !

आत्मिक समाधान जपुन समाजकार्य करणारा मॅकेनिक !

• कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेकांची केली मदत
तुमसर :


“कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान अनेकांनी तुमसर शहरात मदत कार्य राबविले आहे. त्याबाबत चर्चा, फोटो व्हिडियो यातून होतेच. मात्र अमितने आपली खाजगी गाडी रुग्णांकरीता मोफत पुरवून अनेकांचे जिव वाचविले आहे. समाजकार्याच्या नावावर आपले राजकारण साध्य करण्याचा हेतू तो प्रत्येकांचाच असतो असे नाही. काहींना परिस्थिती तर कित्येकांना कोरोनाच्या संकटाने खंबीर केले आहे. त्यातूनच अनेकांची मदत करुनही कुठेही त्याबद्दलचा गवगवा न करता आत्मिक समाधान जपुन समाज कार्य करणारा एक मॅकेनिक सध्या शहरात युवकांमधील चर्चेचा विषय ठरला आहे. नरेंद्र महाराजांच्या विचारांना जोपासणारा अमित कुरंजेकर ह्याने कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान रुग्णांना वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचवून अनेकांचे प्राण वाचविले आहे. त्यातही आपल्या चारचाकी गाडीकरीता कसलाहा भाडा न घेता ज्यांची मदत केली त्यांच्या करीता अमित कठीन काळात धावून येणा-या देवदुतासारखा ठरला आहे. याबद्दलची माहिती त्याच्या मित्रांमार्फत विदर्भ कल्याणला प्राप्त झाली आहे.
तुमसर शहरात अमित कुरंजेकर याचे दुचाकी रिपेरिंगचे छोटेसे दुकान आहे. या व्यतिरिक्त अमित प्रवासाकरीता भाड्याने चारचाकीचा व्यवसायही करतो. शासनाच्या ताळेबंदीदरम्यान इतरांप्रमाणे त्याचेही दुकान बंदच होते. रोजगाराचे मुख्य साधन ताळेबंदीदरम्यान ठप्प झाल्याने अमितही हवालदील झाला होता. सध्या अनलाॅकमुळे आपलें दुकान उघडून तो आपल्या दुचाकी रिपेयरिंगच्या कामाला लागला आहे. मात्र इतरांकरीता ह्या कठीन काळात त्याने आपली चारचाकी गाडी रुग्णवाहीकेप्रमाणे रस्त्यावर उतरवली होती. कोरोनाच्या काळात रुग्णवाहीकांनीही हजारों रुपये पिडीतांकडून लाटल्याचे दृष्य कुणापासून लपलेले नाही. मात्र लुटमारीच्या ह्या निर्दयी काळात अमितने मानुसकी जपली. आपली चारचाकी संक्रमितांकरीता मोफत पुरवली. मानवतावादी विचारांचे उत्तम उदाहरण ठरलेल्या अमितने अनेकांचे प्राण वाचविले आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेत संक्रमनाच्या दृष्टीने तुमसर शहराची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. मात्र अनेकांची मोफत मदत करणा-या अमितशी जेव्हां विदर्भ कल्याणने त्याच्या मदत कार्याविषयी जाणून घेतले तर त्याने समाजकार्याची नविन परिभाषाच मांडली. आपण केलेले कार्य हे फोटो कींवा पुरावे संभाळूण करत बसलो तर ते समाजकार्य कसले? आपले कार्य लोकांच्या चर्चेत असायला हवे! त्यातूनच आत्मिक समाधान सिद्ध केले जावू शकते. अमितने विदर्भ कल्याणशी बोलतांना आपले मत व्यक्त केले. मात्र ज्या काळात समाजमाध्यम हे प्रसिद्धिचे मुख्य व मोफत स्त्रोत असतांना अमितने आपल्या कार्याचा कसलाही गवगवा केला नाही, याचेच मोठे आश्चर्य म्हणावें की समाधान! असो.. मात्र प्रसिद्धी पेक्षा समाधानाला केव्हाही अधिक महत्व ते असतेच, आणि अमितने ते दिखवून दिले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular