Thursday, April 25, 2024
Homeभंडाराअभियंताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस...

अभियंताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आ. परिणय फुके यांच्यासोबत आलेले जि.प.चे अभियंता संघटनेला आश्वासन



जिल्हा परिषदेच्या अभियंता संवर्गातील मोठ्या प्तमाणात रिक्त असलेल्या जागा विशेष बाब म्हणुन तातडीने भरणे बाबत मागील अनेक वर्षापासुन संघटनेमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. तथापी शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मेगा भरतीमध्ये केवळ आरोग्य विभागातीलच रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या अभियंता संवर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे.


याबाबत आज आमदार डॉ परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची नागपूर कार्यालय येथे भेट घेतली व जिल्हा परिषद अभियंता च्या समस्या मार्गी लावण्याबाबत विनंती केली.
देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या संपूर्ण समस्या एकूण घेतल्या व समस्यांवर त्वरित तोडगा करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन डॉ फुके व जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या शिष्ठमंडळाला दिले.

यावेळी श्री संजयजी कुंभलकर, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे महासचिव श्री सुहासजी धारासूरकर, कार्याध्यक्ष श्री सतीशजी मारबते, प्रमुख सल्लागार श्री संजय उगेमुगे, उपाध्यक्ष श्री प्रकाश तांबोळी, श्री परागजी नगराळे, श्री गणेशजी शहारे, श्री महेश सेलूकर, श्री अशोकजी राऊत, श्री संदीपजी महाकाळकर, श्री प्रविणजी मेहकर, श्री चांदेवार, श्री सुरेशजी मस्के, श्री नागेशजी चौधरी, श्री प्रसन्नजी डांगे व इतर अभियंता उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular