Thursday, March 28, 2024
Homeभंडाराअखेर शेतकऱ्यांच्या शेतात साचत असलेला पाण्याला पाय वाट झाली मिळाली पवन मस्के...

अखेर शेतकऱ्यांच्या शेतात साचत असलेला पाण्याला पाय वाट झाली मिळाली पवन मस्के यांच्या प्रयत्नास यश

भंडारा :-
मागील वर्षात जिल्ह्यात वैनगंगा नदी ला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यावेळेस भंडारा तालुक्यातील बेला ते कोरंभी रस्त्यावरील स्लॅब पुराच्या पाण्या बरोबर वाहून गेला होता. तात्पुरता मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आलेला होता मात्र तेथील शेतकऱ्यांचा कसलाही विचार केला गेला नव्हता.

आता आदर्श युवा मंच गणेशपुर भंडाराचे संस्थापक अध्यक्ष पवन मस्के भाजपा सदस्य यांनी सबंधित विभागातील अधिकारी यांच्याशी सतत पाठपुरवठा केल्याने अखेर यश आले आहे.त्यामुळे संबंधित विभागाकडून पाईप
दुरुस्ती, माती हटवून पाण्याला पायवाट,मुरूम टाकुन जागा सवान, खड्डा बुजवून हे कामे करण्यात आले तसेच रोडाच्या खाली पाईप वर्क केल्याने आता पाण्याची वाट मोकळी झाली आहे. यामुळे शेतक-यांची तब्बल तीनशे एकरातील शेतीची मशागत होणार आहे. तसेच सदर कामे झाल्याने शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचनार नाही. साचलेल्या पाणी मुळे पिकाची नुकसान होणार नाही पहिलेच एवढी मोठी जगव्यापी करोना महामारी आणि त्यानंतर पुराचा झटका मागील काळात चा नुकसान यामुळे शेतकरी हताश झाले होते मात्र या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालेला आहे यामुळे पिंडकेपार, कोरभी,बेला, दवडीपर या गावातील शेतकरी आनंदित आहेत त्याबद्दल परिसरातील शेतकरी लक्ष्मण निंबार्ते, कवळु गायधने, मल्हारी निंबार्ते, धनराज लुटे, बुद्धिवान खवास, धनपाल गाढवे, नामदेव लुटे, विनायक खवास, करमचंद निंबार्ते, सुक्रम निंबार्ते, मधुकर टांगले, राजू टांगले यांनी आदर्श युवा मंच गणेशपुर भंडाराचे संस्थापक अध्यक्ष पवन मस्के भाजपा सदस्य यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular