Friday, March 29, 2024
Homeनागपुरतारोली ग्राम पंचायतला युवासेनेचा घेराव .

तारोली ग्राम पंचायतला युवासेनेचा घेराव .

विदर्भ कल्याण कुही रमेशभाऊ
मागिल गेल्या काही दिवसात कुही तालुक्यातील तारोली ग्राम पंचायतचा कारभार चव्हाट्यावर आला …टॅक्सच्या माध्यमातुन गोळा होनार्या रकमेच्या 5% निधी हा अपंग दिव्यांगांवर खर्च करायचा असतो परंतु येथील प्रशासक श्री. आत्राम व सचिव सौ. जाधव यांनी तो निधी अपंगांवर खर्चच न केल्याचे निष्पन्न झाले त्या मुळे तातळीने अपंगांना न्याय मिळऊन देण्यासाठी युवासेना उपजिल्हा प्रमुख आकाश भोयर यांनी युवासैनिक व अपंगांना घेऊन ग्राम पंचायत सचिव सौ. जाधव यांना घेराव घातला ..मागील काही दिवस फोनद्वारे ते या कामाच पाठपुरावा करत होते परंतु 6 पैकी फक्त दोनच व्यक्तींचे चेक काढण्यात आले बाकी 4 अपंग लोक त्या पासुन वंचीत होते …2 लोकांनी (अमोल रेहपाडे व त्यांच्या पत्नी) यांनी ते चेक घेन्यास नकार दिला ….

बाकी लोकांचे सुद्धा चेक द्या तेव्हाच आम्ही चेक स्वीकारु असा पवित्रा त्यांनी घेतला …ही बातमी शिवसेनेच्या पदाधिकार्यांना कडताच ते लागलीच ग्राम पंचायत तारोली येथे काल दि. 21 जुन ला सगळ्या माहीतीनिशी पोहोचले व अपंगांचा हक्क जर दोन दिवसात त्यांना मिळाला नाही तर तिसर्या दिवशी सर्व अपंगांना घेऊन ग्राम पंचायत कार्यालया सामोर धरणे आंदोलन करु असा पवित्र घेतला …शिवसैनिकांनी कार्यालयात जाता बरोबर मोबाईल विडीओ सुरु केला तर त्या विडीओ काढण्यावर सचिवांचा आक्षेप होता परंतु शिवसैनिकांनी विडीओ चालुच ठेवला ..या प्रकरनात प्रशासक आत्राम यांना आकाश भोयर यांनी 5 वेळा फोन केले परंतु त्यांनी फोन स्वीकारला नाही ..ग्राम पंचायतचे सरपंच श्री. सहारे यांना याबाबत विचारले असता मी पदावरुन पाय उतार होण्या आधी अपंगांच्या बाबतीत ठराव घेतला होता परंतु त्यांना त्यांचा हक्क का मिळालं नाही हे मलाही माहीत नाही मी आता पदावर नाही असं मनत आपली जबाबदारी त्यांनी झटकली .ग्राम पंचायत तारोली चा सुमारे 90ते 95% टॅक्स वसुल झालेला आहे ..या सर्वांच्या राजकारणात अपंगांच मरण होत आहे …लाॅकडाऊनच संकट असतांना त्यांना ग्राम पंचायत सुद्धा सहाय्य करत नसेल तर त्यांनी काय कराव .युवासेनेने अपंगांसाठी उचल्लेल पाऊल कौतुकास्पद आहे …अपंगांच्या ,सामान्य जनतेच्या हक्कासाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरत राहील असे आकाश भोयर यांनी सांगीतले ..या प्रसंगी आयटीसेल तालुका प्रमुख रोशन हरकंडे ,उपविभाग प्रमुख स्वप्नील मेश्राम,अंकुश गोहने , विकास मेश्राम , करण ढपकस ,कार्तीक पडोऴे , विशाल ढपकस उपस्थीत होते…*

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular